भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संकल्पित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने स्वाभिमानी सप्ताहाची सुरुवात वाल्मीक नगर कसबे सुकाणे तालुका निफाड येथे करण्यात आली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतला रिपब्लिकन पक्ष सर्वसामान्यांना न्याय देणारा उपेक्षितांचे प्रश्न सोडवणारा, वंचितांना मुख्य प्रवाहात आणणारा,असून स्वाभिमानी सप्ताहात कार्यकर्त्यांशी संवाद साधत कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्याचे आवाहन व सूचना संकल्पित रिपाई पक्षप्रमुख प्रकाश पगारे सर यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. प्रसंगी वाल्मीक नगर कसबे सुकेणे येथील शाखेचे उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी निफाड तालुकाप्रमुख केदुभाऊ गायकवाड, महिला जिल्हाप्रमुख रेखाताई शेलार, शहराध्यक्ष चंद्रकला ताई बोरुडे, सामाजिक कार्यकर्ते संजयजी पवार, उपजिल्हाप्रमुख रत्नाकर निकम,लहानू सोनवणे, संजय गांगुर्डे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
More Stories
चीन आपल्या धार्मिक धोरणांना पुढे नेण्यासाठी सेऊलमधील “बौद्ध मैत्री”चा वापर करत आहे.
भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष, भारत सरकारच्या प्रयत्नांमुळे १२७ वर्षांनी भारतात परत येऊ शकले
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारक येवला कामासंदर्भात आज मुंबईत मंत्रालयात आढावा बैठक