दुःख नाही फारसे मजला
तुझ्या अचानक जाण्याने
गळा तुझा बाटणार होता
माझ्या भीमाच्या एका गाण्याने
भीमाच्या संविधानाने तुझा
आवाज पोहचला देशा देशात
नाही तर चार भिंतीच्या आड तू
दडून असती गोशात
बा भिमाची ऍलर्जी तुला
दिला भारतरत्न कुण्या शहाण्याने
गळा तुझा बाटणार होता
बा भीमाच्या एक गाण्याने
जरी असेल तुझ्या कंठात
कोमल आणि मधुर सूर
पण तुझ्याविरुद्ध मस्तकात माझ्या
अहंकाराचा निघतोय धूर
जरी बाटला असता कंठ तुझा
धुतला असता गोमूत्र आणि शेणाने
जर का बाटला असता कंठ तुझा
बा भीमाच्या एका गाण्याने
जर नसते दिले स्त्री स्वातंत्र्य तुला
तू फक्त लाटला असता मैदा
चार भिंतीच्या आड राहून तू
फक्त लेकरं केले असते पैदा
हिंदू कोडबील बहाल करून भीमाने
तुझी ओटी भरली सोन्याने
मग बाटला असता का कंठ तुझा
बा भीमाच्या एका गाण्याने
जरी असशील तू भारताची
गाणसम्राज्ञी ती कोकिळा
बा भिमामुळेच फुलला तुझ्या
आनंदी जीवनाचा मळा
फारसे दुःख नाही मला
मी लिहतो फक्त
तू गेलीस या बहाण्याने
कारण बाटणार होता कंठ तुझा
बा भीमाच्या एका गाण्याने
विद्रोही कवी : रविंद्र सोनाळे गायतोंडकर
9960421715

More Stories
दिशादर्शक Dishadarshak
वसविले गाव मी
बाबा तुम्ही नसतात तर