गर्द काळोखातल्या भयाण काळी
तूच होतास आमचा क्रांतिसूर्य
अन् शीतल छाया देणारा
चंद्रही तूच होतास नव्या निळाईचा
जीर्ण सनातन रूढींना
वाकवून लेखणीने
तूच दाखविलीस दिशा
अन् संपविलीस युगायुगाची
भयाण निशा
दिलीस जगण्याची जाणीव अन् ममतेची माया ही
आयुष्याचं देऊन योगदान
झिजविलीस अख्खी काया ही
पुरातन संस्कृतीच्या जोखडातून
केलेस बा मुक्त आम्हांस
अन् आणलीस नवी त्वचा
आमच्या अंगा मांसास
आता जिथं तिथं तूच बा
आमच्या प्रत्येक घासांत
अन् तूच वसलाय
समस्त नसांनसती
अशोक भालेराव, नाशिक
मो. 9226032898
More Stories
वसविले गाव मी
बाबा तुम्ही नसतात तर
बुद्धपौर्णिमेचं चांदणं