September 4, 2026

Buddhist Bharat

Buddhism In India

वसविले गाव मी

रातदिन चिंतनातून लिहिले ताव मी
बहिष्कृत भारताचे वसविले गाव मी..

अविरत झिजलोय भल्यास तुमच्या
झाले किती ?सांगू, तुम्हास घाव मी..१

लागले भजाया अन् दगडास पुजाया
म्हणालो कधीच ना दगडास पाव मी..२

पैशापायी कशाला होतात मिंधे
बघतोय ही स्वार्थी काव काव मी..३

वाचली पुस्तके अन् धर्मग्रंथं हजारो
दिला कधीच ना अंधश्रद्धेस वाव मी..४

जगलो स्वाभिमानी..आयुष्यभर सदा
केली ना कोणतीच दादांनो हाव मी..५

होता लयास गेला बुद्धधम्म इथला
पुनर्जीवित केले इथे धम्माचे नाव मी..६

लोकहितास रचिले देश संविधान
दिला कधीच ना पैशास भाव मी..७

अशोक भालेराव
जी.. 251,गांधीनगर,प्रेस कॉलनी,नाशिक…422006
मो. नं.9226032898