यांना कोण शिवुन घेत नव्हते।
यांना जवळ येऊ देत नव्हते
यांच्या सावलीचा विटाळ व्हायचा।
आज यांचे गावात बंगले झाले हो
बाबा तुमचे नाव विसरुन गेले हो।।
बाबा तुमचे खाऊन गद्दार झाले हो ।।१।।
पिढ्यान पिढ्या गेल्या दरीद्री मधी
कमरेला लंगोट अंगात फाटकीच बंडी
नवा कपडा अंगावर घालायची होती बंदी
आज हे गद्दार सुटा बुटात आले हो!!
बाबा तुमचे नाव विसरुन गेले हो।।
बाबा तुमचे खाऊन गद्दार झाले हो ।।२।।
अपमानाचे जिने जगत होता रोज
गावा बाहेर झोपडे जिंदगी होती बोझ
जाती वादाचे जहर पिता होता रोज
देवदत आज हे गद्दार सरपंच मंत्री झाले हो
बाबा तुमचे नाव विसरुन गेले हो
बाबा तुमचे खाऊन गद्दार झाले हो
✍️ विद्रोही कवि देवदत सुर्यवंशी निलंगा
मो नं : 9146669005

More Stories
दिशादर्शक Dishadarshak
वसविले गाव मी
बाबा तुम्ही नसतात तर