सतरा गाठी होत्या जीवनी आमच्या
अन्
आयुष्य होतं गंजलेलं भंगार
रोवली सम्यक क्रांती बाबांनी
करुन रक्ताचे पाणी
दिली हाक समतेची
मोळकळीस आणली
विचारधारा मनूची !!!!!
संविधानीक मुलतत्वे
कोरली मानवी हृदयावर
लेखणीच्या ज्वालांनी
पेटविली ज्योत पानापानावर
क्रांतीच्या मशालीतून
घडविली धम्म क्रांती !!!!!
देशाची अखंडता राखण्यासाठी
बाबा तुम्ही भिजवली ज्ञानरुपी झर्यानी
या देशाची माती
तोडल्या गुलामगिरीच्या बेड्या
दिली सम्यक संबुद्धांची वाणी !!!!
करुणामय बोधीवृक्षाच्या छायेत
दुमदुमला जयघोष…
बुद्धं शरणं गच्छामिचा
केला उच्चाटन अस्पृष्यांचा !!!!!
प्रेरणादायी व्यक्तीमत्वाची अस्मिता
जाऊ नये लयास….
या साठी नेहमीच प्रयत्नशील,
आहे आमचा समाज
अर्चना चव्हाण,
नागपुर जिल्हा सचिव व यवतमाळ मार्गदर्शीका.
8624062012

More Stories
दिशादर्शक Dishadarshak
वसविले गाव मी
बाबा तुम्ही नसतात तर