६ डिसेंबर ५६ साली
घटका दुष्ट ती आली
त्या काळाने भीमरावांची
काळज्योत ती चोरली
टपून बसला कसा काळ हा
रात्र ती वैरीण झाली
दुष्ट काळाने या
पेटून उठल्या दिशादाही
गहिवरली चंदन लाकडे ही
मावळला सूर्य युगाचा
झाली जीवाची लाही लाही
रडू लागली जनता धाई धाई
लोपले सुख कैवार्यांचे
थोर उपकार भीमाच्या शाईचे
कायद्याची दिली गाथा
नमवला बुद्धा चरणी माथा
लढा दिला गुलामगिरीला
केली मात अंधश्रद्धेला
महामानवाने केली नवलाई
लावले रोप बौद्ध धम्माचे
शेवटी हृदयी आमच्या
बुद्ध मुर्ती कोरली
भारत भू ची शान आम्ही
जळतांना चितेवर पाहिली
झाला गुडूप नवकोटीचा प्रकाश
गेला निघून देशाचा वाली
कोण ना होई तैसा आता
भीमरावांवाणी
अमर होतांना कीर्ती भीमाची
डोळ्यांनी आम्हीही पाहिली
६ डिसेंबर ५६ साली दुष्ट काळाने
भीमरावांची काळ ज्योत ती चोरली
अर्चना उके चव्हाण, नागपूर.
८६२४०६२०१२

More Stories
दिशादर्शक Dishadarshak
वसविले गाव मी
बाबा तुम्ही नसतात तर