March 2, 2026

Buddhist Bharat

Buddhism In India

बुद्ध धम्म समजणे म्हणजे काय ? What is understanding Buddha Dhamma ?

बुद्ध धम्म कर्मप्रधान धम्म आहे हे समजणे.
धम्म हा उच्च जीवनस्तर प्राप्त करण्याचा मार्ग आहे
बुद्धाच्या मतानुसार व्यक्तिगत शुद्धी हा जगातील चांगल्या गोष्टीचा पाया आहे.

बंधू, भगिनीनो……
मनुष्याने व्यक्तिगत शुद्धी करिता चारित्र्याचे सामर्थ्य वाढवणे आवश्यक आहे.
बुद्ध धम्म नुसार माणसामध्ये जर व्यक्तिगत शुद्धी नसेल तर तो चांगल्या गोष्टी करण्यास साधनभूत कसा होवू शकेल?
म्हणून बुद्ध म्हणतात ज्याला चांगला मनुष्य होण्याची इच्छा आहे,. त्याने जीवनाची काही तत्वे पाळली पाहिजे.
मनुष्य कधी बौद्धिक परिपक्वतेकडे दुर्लक्ष्य करतो. परंतु मनुष्याने आपल्या आचार विचाराचा दर्जा सुधारला पाहिजे
बौद्ध धम्मात मनुष्य केंद्र स्थानी आहे. नीतीला प्रथम प्राधान्य आहे.
यात स्वर्ग, नर्क, ईश्वर, आत्मा, अवतार, कर्मकांड, भक्ती याला कुठलाही थारा नाही.
2मन विकासाला ( चित्त प्रशिक्षणला )
ट्रेनिंग ऑफ माईंड ला पूर्णपणे प्राधान्य आहे.
बौद्ध धर्मात व इतर धर्मात हाच फरक आहे.
इतर धर्मात जाती व्यवस्था, देवी देवता, स्वर्ग नर्क, कर्मकांड इत्यादी ला धर्म म्हणतात. नीतीला नगण्य स्थान आहे.
परंतु बौद्ध धर्मात देव नाही. जन्मापेक्षा व्यक्ती व त्याचे कर्म ह्यात प्रधान आहेत.
बुद्धाने मनुष्य मात्राला सर्वोत्तम जीवन स्तर प्राप्त करण्याचा मार्ग सांगितला आहे.
बुद्धाच्या शिकणी प्रमाणे एकदा मनुष्याचे मन परीवर्तन झाले की, मनाची पुनर्रचना झाली की तो दुःख मुक्तीच्या मार्गावर स्व बळाने चालू लागेल.
मन च ( चांगले विचार ) सर्व चांगल्या किंवा वाईट कर्माचे उगम स्थान आहे.
मनाने चांगले विचार केले, चांगले कर्म केले तर माणसाच्या मागे सावली प्रमाणे सुख धावेल. जर वाईट विचाराने अकुशल कर्म केले तर बैलाच्या खुरा मागे जसे गाड्याचे चाक धावते तसे दुःख धावेल.
म्हणून मनुष्याच्या मनाची शुद्धी व पुनर्रचना purification and reconstruction of mind हाच धम्माचा हेतू आहे.
नीती morality हा मनुष्या मनुष्यातील व्यवहाराचा आधार आहे.
म्हणून मनुष्याने इतरांशी नीतीने आचरण केले पाहिजे.
बुद्धाच्या धम्मा ने जगातील सर्व समस्या चुटकी सारख्या सुटतील.
बुद्धाने शिलाचे फायदे सांगितले आहेत.
मनुष्याचे शील सदाचार चारित्र्य हीच खरी संपत्ती आहे.
आपल्या वाईट कर्मा मुळे दुसऱ्या जीवमात्रांचे सुख नाहीसे होते.
स्वतःच्या व इतरांच्या दुःखाचे कारण बनते.
ज्याचे मन चांगले आहे , ज्याचे मन नियंत्रित आहे तो निर्मल, शुद्ध, आनंदित राहतो.
तो सर्व विकारांपासून परावृत्त राहतो.
त्या मुळे तो राग, द्वेष, मोह भय या मार्गावर जात नाही.
त्यामुळे तो दुराचरण करत नाही.
विधायक मार्गाने कमावलेल्या संपत्तीतून तो कल्याणकारी कर्म करतो.
स्वतःचे व कुटुंबाचे कल्याण करतो.
त्याची धन संपत्ती वाढते व सुरक्षित राहते.
त्याला जुगार, मद्यपान वाईट कर्म इत्यादी करण्याची भीती व लाज वाटते.
तो चांगल्या मित्राची निवड करतो.
तो आळशी राहत नाही.
जो व्यक्ती चांगल्या मार्गाने जीवन जगतो ,तो बौद्ध मार्गाने जीवन जगतो.
तो निश्चित जागरूक, चिकित्सक, शहाणा, विवेकी, बुद्धिवान, होतकरू, उधोगी, परोपकारी, कष्टवान, कर्मप्रिय, सहनशील, स्वाभिमानी असतो.
त्याचा प्रज्ञा, शिल, करुणा मैत्री, समता, बंधुता न्याय हा स्वभाव गुण असतो.
तो इतरांचा व स्वतःचा विकास करतो.
इतरांचा आदर करतो.
वैज्ञानिक दृष्टिकोन विकास करून श्रध्देचा विकास करतो.
बुद्ध धम्मा मुळे व्यक्तीच्या विचारात आंतरबाह्य बदल होतात.
माणसाला माणुसकीची जाणिव होते.
जेव्हा मनाची पुनर्रचना होईल, तुम्ही स्वयं प्रकाशित व्हाल.
मनुष्याने खूप बोलले नाही तरी चालेल,परंतु व्यवस्थित आचरण केले पाहिजे.
धम्म हा व्यवहारात आहे.
मनुष्याने स्वतःतील दोष प्रथम सुधारले पाहिजे.
आपण धम्मधर झालो पाहिजे.
सर्व क्रांतीचा पाया हा धार्मिक क्रांती आहे.
जगाला बांधणारी बाब म्हणजे मैत्री होय.
म्हणूनच या प्रगतिशील जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धाची गरज आहे.
बुद्ध तत्वज्ञानच जगाचे कल्याण करू शकते. हेच अंतिम सत्य आहे.
धम्म प्रचारक :- डॉ. जयप्रकाश बोधी, नागपुर 9421725648.