May 20, 2026

Buddhist Bharat

Buddhism In India

विश्वशांती परिषदेत भारत-श्रीलंकेतील भंतेदरम्यान करार, श्रीलंकेत उभारणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन

नागपूर : भारत आणि श्रीलंका यांच्यातील बौद्ध धम्माच्या संशोधन आणि अध्यापन सहकार्याला नवे बळ देणारा महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. या करारांतर्गत श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये एक एकर परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन उभारण्यात येणार आहे.

बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून नागपुरात तीन दिवसीय ‘विश्वशांती परिषद – २०२६’ नुकतीच पार पडली. या परिषदेत भारत आणि श्रीलंकेत झालेल्या करारानुसार हे डॉ. आंबेडकर भवन उभारण्यात येईल. हा करार संघकाय फाउंडेशनचे अध्यक्ष भदंत प्रशीलरत्न गौतम आणि श्रीलंकेतील माथा फाउंडेशनचे संस्थापक वें. अधुरलिये रतना थेरो यांच्यात करण्यात आला. या  भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांतील सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक संबंध अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने हा करार महत्त्वपूर्ण ठरणार आहे. – भदंत प्रशीलरत्न गौतम, अध्यक्ष संघकाय फाउंडेशन, भारत

डॉ. आंबेडकर अध्यापन केंद्र : या कराराअंतर्गत बौद्ध धम्म आणि मूल्यांचा प्रचार-प्रसार, जागतिक शांतता व आंतरधर्मीय सलोखा वृद्धिंगत करणे, शैक्षणिक व सामाजिक कल्याणकारी प्रकल्प राबविणे, भारत-श्रीलंका सांस्कृतिक देवाण-घेवाण वाढविणे, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्ययन केंद्र तयार करण्यात येणार आहे. याशिवाय भविष्यात बौद्ध परिषदांचे आयोजन, ध्यान शिबिरे आणि विविध मानवतावादी उपक्रम संयुक्तपणे राबविण्याचाही निर्णय या कराराद्वारे घेण्यात आला.

कराराचा मुख्य उद्देश आंतरराष्ट्रीय बौद्ध सहकार्य अधिक दृढ करणे, भगवान बुद्धांच्या शिकवणीचा जागतिकस्तरावर प्रसार करण्यासोबतच शांतता, बंधुता आणि मानवतावादी मूल्यांना प्रोत्साहन देणे हा आहे. करारावेळी दक्षिण कोरियासह विविध देशांतील आंतरराष्ट्रीय बौद्ध प्रतिनिधी, बौद्ध भिक्षु, विद्वान, संशोधक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्मदीक्षा दिली, त्या दीक्षाभूमीच्या शहरात हा करारानुसार डॉ. आंबेडकर भवन उभारण्यात येईल. जागतिक स्तरावर बौद्धांचे ऐक्य साधण्याचे हे संकेत आहेत.

-भदंत अथुरलिये रतना थेरो, संस्थापक – माथा फाउंडेशन, श्रीलंका.