नमो बुध्दाय जय भीम
भगवान बुध्दांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक पुण्यभूमी नालासोपारा येथे संघमित्रा गंधकुटी बुध्दविहार ट्रस्ट (ई-३६०२/ठाणे ) संघमित्रा महाथेरी विरासत या कार्यक्रमाचे आयोजन नालासोपारा (प.) कळंब बीच या ठिकाणी भव्य दिव्य प्रमाणात करण्यात येणार आहे.
तरी ह्या कार्यक्रमासाठी बौध्द भिक्षु आणि भिक्षुणी संघ मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहेत. तरी धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातून अनेक धम्म उपासक-उपासिका यांनी उपस्थित रहावे.
सम्राट अशोक यांचा इतिहास पुन्हा पुर्नजीवित करू या. त्यांच्या मुलांनी संघमित्रा व महेंद्र यांनी केलेला धम्मप्रचार श्रीलंकेमधील धम्ममय वातावरण आणि बोधी वृक्षाचे रोपण अनुभवता येईल असे या कार्यक्रमाचे स्वरूप असणार आहे.
हा कार्यक्रम प्रथमच नालासोपारामध्ये कळंब बीच समुद्रकिनारी होणार आहे. या ऐतिहासिक आणि धम्ममयी कार्यक्रमास आपली उपस्थिती वंदनीय आहे.
रविवार दि. २४ मे २०२६ ठिकाण : नालासोपारा (प.) कळंब बीच
बुध्द स्तुप येथे सकाळी १० वा. बुध्द वंदना
११.३० ते १२.३० पर्यंत भिक्खुणी संघाचे भोजन
१२.३० ते २.३० प्रवचन
२.३० वा. कळंब बीचकडे जाण्याची तयारी
३ ते ४ वा. भिक्खु आणि भिक्खुणी संघाची कळंब बीच येथे रॅली
५ वा. भिक्खुणी संघमित्रा श्रीलंका यांचे बोटीतून स्वागत
६ ते ७ वा. सर्व भिक्खु आणि भिक्खुणी यांचे स्वागत मान्यवरांचे स्वागत
७ वा. कार्यक्रमाची सांगता.
कार्यक्रम आयोजिका : भिक्खुणी एस. संघमित्रा महाथेरी नालासोपारा संपर्क : ९८९०४७७९१३
More Stories
“वैशाख दिपोत्सव जुहू चौपाटी नाही तर चैत्यभूमी येथे होणार”
त्रिरश्मी बुद्ध लेणी येथे बुद्धिस्ट भारत टीमकडून माता रमाई आंबेडकर जयंती साजरी, भोजनदानातून धम्मसेवा
महाबोधी महाविहार मुक्तीसाठी जंतर-मंतरवर 12 फेब्रुवारी पासून बौद्धांचा एल्गार