नवी मुंबई : सपेक्षवादाचा सिद्धांत मांडणारे थोर जर्मन शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष 22 प्रतिज्ञा अभियाना महाराष्ट्र मुख प्रचारक प्रदिप जाधव हे होते तसेच या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून डॉ. देहाडे सर आणि 22 प्रतिज्ञा अभियान या अभियानाचे संस्थापक IRS अरविंद सोनटक्के सर (निवृत्त आयकर आयुक्त) हे उपस्थित होते. अरविंद सोनटक्के सर यांनी प्रयोगाच्या माध्यमातून आईन्स्टाईन यांचा सपेक्षवाद आणि Reletivity या सिद्धांत समजावून सांगितला आणि अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या इतर वैद्यानिकवाद याची अगदी सविस्तर माहिती दिली. आईनस्टाईन यांचे हे वैज्ञानिक विचार शाळा, कॉलेज तसेच घरा घरात पोचण्याची खूपच आवशकता असल्याचे विधान केले.
या कार्यक्रमास मुंबईतील विविध संघटनेचे कार्यकर्ते तसेच आंबेडकरी साहित्यिक आनंद म्हस्के सर, अंधश्रद्धा निर्मूलन समिती नवी मुंबई प्रमुख अशोक निकम सर हे सुद्धा या कार्यक्रमास उपस्थिती होते. साहित्यिक आनंद म्हस्के सर यांनी विचार मांडताना म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असणारा असा स्तुत्यजण्य कार्यक्रम हा 22 प्रतिज्ञा अभियान अंतर्गत घेतला जात असून हा प्रतेक ठिकाणी होणे गरजेचे आहे, जागतिक पाहिले वैज्ञानिक तथागत गौतम बुद्ध यांना जे अभिप्रेत आहे तेच आपण या विज्ञानिकाची जयंती साजरी करून करीत आहोत, त्यांनी उपस्थितांना यांतीच्या शुभेच्या दिल्या आणि सर्वांना आवाहन केले.
| हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी 22 प्रतिज्ञा अभियानाचे मुख्य प्रचारक कमेश कांबळे यांनी खूप मेहनत घेतली तसेच 22 प्रतिज्ञा अभियान प्रचारक विनोद दादा पवार नीता सोनटक्के मॅडम दिनकर कांबळे, विनोद वासेकर उपस्थित होते. अतीशय मार्मिक आणि वैचारिक असे कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राजू रोटे यांनी केले तर उपस्थित सर्वांचे आभार 22 प्रतिज्ञा अभियान मुख्य प्रचारक दिनकर काळे यांनी मांडले. अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम झाला.
The birth anniversary of the great German scientist Albert Einstein was celebrated under the 22 Pledge campaign
More Stories
नागपूर येथे बामियानच्या बुद्ध पुतळ्याची प्रतिकृती उभारणार Replica of Bamiyan Buddha statue to be built in Nagpur
भीमटेकडीवर जागतिक धम्म परिषदेचा दुसऱ्या दिवशीही उत्साह उसळला., बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या– रामदास आठवले
🌼 दिवस ३ – धम्मपद महोत्सव (मुख्य दिवस) फग्गुण पुन्नमी – पूज्य आचार्य बुद्धरक्षित महाथेर यांची १०४ वी जयंती