ता. १५ : इंडो तिबेटियन मंगल मैत्री संघाच्या अध्यक्षा, ज्येष्ठ धम्म उपासिका तथा प्रचारक ताशी डोल्मा (वय ५५) यांचे अल्प आजाराने मुनगूट (कर्नाटक) येथे नुकतेच निधन झाले. तिबेटियन धर्मगुरू दलाई लामा यांना नाशिकमध्ये आणण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.
दलाई लामा २०१५ मध्ये नाशिकमध्ये आल्यावर त्यांनी सर्व बौद्ध संघटना व दलाई लामा यांचा योग्य समन्वय घडवून आणला होता. अनेक बुद्धिस्ट संस्थांशी त्या जोडलेल्या होत्या. तिबेटियन नागरिकांच्या नाशिकमध्ये वास्तव्य व समस्यांबद्दल प्रशासनाशी त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. दानशूर देणगीदार धम्म प्रचारक, धम्मसेविका व धम्म-भगिनी ताशी डोल्मा दीदी यांचे दि. १२/०६/२०२५ रोजी दुःखद निधन झाले
इंडो तिबेटन मंगल मैत्री संघ (नाशिक), इंडो तिबेटन वेल्फेअर असोसिएशन (नाशिक) तसेच धम्म संस्कार प्रचार-प्रसार व प्रबोधन समिती (नाशिक) यांसारख्या सामाजिक व धम्मकार्य क्षेत्रातील प्रतिष्ठित संस्थांच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पद्धतीने अग्रेसर असलेल्या आणि नागसेन बुद्ध विहार टागोर नगर येथील बुद्ध रूपाच्या दानशूर देणगीदार धम्म प्रचारक, धम्मसेविका व धम्म-भगिनी ताशी डोल्मा दीदी यांचे दि. १२/०६/२०२५ रोजी दुःखद निधन झाले आहे. नाशिकच्या विविध सामाजिक व धार्मिक संस्थांच्या तसेच उपासक-उपासिका संघाच्या वतीने स्मृतीशेष ताशी डोल्मा दीदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी रविवार, दि. २२ जून २०२५ रोजी स. १०.३० वा. नागसेन बुद्ध विहार, टागोर नगर याठिकाणी आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
More Stories
नागपूर येथे बामियानच्या बुद्ध पुतळ्याची प्रतिकृती उभारणार Replica of Bamiyan Buddha statue to be built in Nagpur
भीमटेकडीवर जागतिक धम्म परिषदेचा दुसऱ्या दिवशीही उत्साह उसळला., बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या– रामदास आठवले
🌼 दिवस ३ – धम्मपद महोत्सव (मुख्य दिवस) फग्गुण पुन्नमी – पूज्य आचार्य बुद्धरक्षित महाथेर यांची १०४ वी जयंती