बुलढाणा येथील बुद्ध रश्मी महाविहाराच्या नवीन बुद्ध विहाराच्या उभारणीसाठी भूमिपूजन व शिलान्यास सोहळ्याचे आयोजन शनिवार, दि. १२ सप्टेंबर २०२६ रोजी भडोळा, बुलढाणा येथे करण्यात आले आहे. या धार्मिक व सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमास भिक्खू संघ तसेच धम्मउपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.०० वाजता भूमिपूजनाने होणार असून त्यानंतर १०.१५ वाजता शिलान्यास, ११.०० वाजता महासंघ भोजनदान, दुपारी १.०० वाजता परित्राण पाठ, २.०० वाजता बुद्धारोपण, २.४५ वाजता पुण्यानुमोदना आणि दुपारी ३.०० वाजता उपासक भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.
बुद्ध रश्मी महाविहाराच्या माध्यमातून बुद्ध धम्माचा प्रचार-प्रसार, सामाजिक प्रबोधन, शांतता, करुणा व मानवकल्याणाची भावना वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने या नवीन बुद्ध विहाराची उभारणी करण्यात येत आहे. या पवित्र कार्यासाठी सर्व धम्मप्रेमी नागरिकांनी सहभागी होऊन सहकार्य करण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
बुद्ध रश्मी महाविहाराच्या माध्यमातून बुद्ध धम्माचा प्रचार-प्रसार,प्रमुख उपस्थिती
परम पूज्य गुरु भन्ते जी, भन्ते यश , भन्ते उदित ज्ञान थेरो , भन्ते ज्ञान रक्षित थेरो
भन्ते मैत्री थेरो , भन्ते विवेक थेरो , भन्ते शांतिचित्त थेरो , भन्ते धम्मसेन थेरो , तसेच आदरणीय भिक्खू संघ
नवीन बुद्ध विहाराची उभारणी करून बुद्ध धम्माच्या माध्यमातून समाजात शांती, करुणा, मैत्री, समता आणि मानवतावादी विचारांचा प्रसार करणे, हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
“जो आवास दान देतो, तो सर्व काही देणारा होतो.”
या भावनेतून नवीन बुद्ध विहाराच्या निर्मितीसाठी धम्मप्रेमी नागरिकांनी तन-मन-धनाने सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
बुद्ध रश्मी महाविहार, बुलढाणा
तसेच आयोजक भिक्खू संघ व धम्म उपासक मंडळी.
आदरणीय भिक्खू संघ, धम्म उपासक-उपासिका, सामाजिक कार्यकर्ते आणि परिसरातील धम्मप्रेमी नागरिक.
More Stories
बौद्ध भिक्षूंना शांतता प्रयत्नांसाठी युटा सिनेटने मान्यता दिली
नेपाळमधील बौद्धांनी पुरामध्ये बेपत्ता झालेल्या आपल्या कुटुंबीयांसाठी प्रतिकात्मक अंत्यसंस्कार करण्यास सुरुवात केली आहे.
धुळे: लुंबिनी बुद्ध विहार बनले धम्म प्रचार व प्रसाराचे प्रमुख केंद्र; विविध उपक्रमांना प्रतिसाद