उल्हासनगर: परमपूज्य बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या ‘दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया’ (भारतीय बौद्ध महासभा) उल्हासनगर तालुका शाखेच्या वतीने बौद्ध धम्माचा प्रचार, प्रसार आणि धम्म संस्कार दृढ करण्यासाठी १० दिवसीय ‘बौद्धाचार्य / श्रामनेर शिबिराचे’ भव्य आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय संरक्षक आद. महाउपासिका मीराताई यशवंतराव आंबेडकर आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष आद. डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडणार आहे.
शिबिराची माहिती व तपशील:
-
कालावधी: १७ नोव्हेंबर २०२६ ते २६ नोव्हेंबर २०२६
-
ठिकाण: पंचशील बुद्ध विहार, सुभाष नगर, उल्हासनगर – ०३
-
पात्र वयोगट: १८ ते ५५ वर्षे
धम्म संपादन करण्याची सुवर्णसंधी
चिवर परिधान करून धम्माचे सखोल ज्ञान प्राप्त करणे ही कुशल कर्माची साथ असून धम्म संपादन करण्याची ही एक उत्तम सुवर्णसंधी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त धम्मबांधवांनी श्रामनेर संघात प्रवेश घेऊन या शिबिराचा लाभ घ्यावा, असे नम्र आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
नाव नोंदणीसाठी संपर्क:
शिबिरात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या साधकांनी आपली नावे लवकरात लवकर उल्हासनगर तालुका पदाधिकारी यांच्याकडे नोंदवावीत.
-
आयु. रोशन रवि पगारे (अध्यक्ष, उल्हासनगर तालुका) – 📱 8080305120
-
आयु. संदिप बंडू उबाळे (सरचिटणीस, उल्हासनगर तालुका) – 📱 9320062155
-
आयु. देविदास कुंडलिक कांबळे (संस्कार उपाध्यक्ष, उल्हासनगर तालुका) – 📱 90969 04184
-
आयु. सोमाजी श्रावण खैरनार (संस्कार सचिव, उल्हासनगर तालुका) – 📱 99232 53573
-
आयु. रमेश हरी वानखेडे (संस्कार सचिव, उल्हासनगर तालुका) – 📱 98906 47601
आपले धम्म बांधव, भारतीय बौद्ध महासभा, उल्हासनगर तालुका शाखा.

More Stories
भव्य बौद्ध धम्म मिरवणूक बोमडिला येथे दाखल
भिक्खूणी संघमित्रा महाथेरी इंडो श्रीलंका विरासत (इतिहास) उत्सव
“वैशाख दिपोत्सव जुहू चौपाटी नाही तर चैत्यभूमी येथे होणार”