सोमवार, दिनांक : 29/06/2026 ( जेष्ठ पौर्णिमा ) हिंगणा तालुक्यातील ईसासनी- वागधरा ग्रामपंचायत अंतर्गत भीमनगर येथे भदन्त बोधिविनीत स्मृती पर्यावरण परिसरात बोधिमग्गो सेवा संस्था द्वारा संचालित बोधिमग्गो महाविहार हे या परिसरातील ऐतिहासिक अविश्वसनीय प्रेक्षणीय स्थळ म्हणून ओळखले जाते. या महाविहारात संपूर्ण वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. व्यक्तिमत्त्व विकास, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक धम्म शिबीर, मेडिटेशन शिबीर, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, व्यवसाय विषयक शिबीर आयोजित करण्यात येतात. कम्युनिटी किचन देश-विदेशात विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली जाते. सर्व सोयी सुविधा उपलब्ध असलेल्या या महाविहाराच्या मुख्य प्रवेश द्वार अतिशय देखणा व्हावा यासाठी प्रयत्न असुन या प्रवेश द्वाराच्या बांधकामाचे भूमिपूजन ‘जेष्ठ पोर्णिमा’ चे औचित्य साधून करण्यात आले.
या प्रसंगी आल इंडिया भीक्खु संघ विदर्भ प्रदेश चे अध्यक्ष पुज्य भदन्त प्रियदर्शी महास्थवीर यांचे हस्ते व ईसासनी ग्रामपंचायत चे सरपंच अरविंद ढोणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला जेष्ठ दायीका जोहर आई कांबळे, संस्थेचे अध्यक्ष शंकरराव निकोसे, ग्रामपंचायत सदस्य सिद्धार्थ बागडे, अजय जनबंधु, मिनाताई मेश्राम, उषाताई प्रधान, दादाराव मसराम, जेष्ठ पत्रकार लिलाधर दाभे, समाज सेवक शशिकांत थोटे, अनिल मेश्राम, अशोक जांभुळकर, भदंत सुमंगल, भदंत विपस्सी, भदंत मैत्रेय, भदंत सुजाततिस्स, श्रामनेर विपस्सी आदी उपस्थित होते.
उपरोक्त कार्यक्रम चे प्रास्तविक व संचालन भदन्त नाग दिपंकर महास्थवीर यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव डॉ. भदन्त सीलवंस महास्थवीर यांनी केले. या कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने उपासक- उपासिका आणि नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बोधिमग्गो सेवा संस्था चे पदाधिकारी सदस्य, बोधिमग्गो महाविहार दायक- दायीका सभा, बोधिमग्गो धम्म सन्डे स्कूल, बोधिमग्गो कम्युनिटी किचन, बोधिमग्गो धम्म सेवा पथक च्या प्रग्या मेश्राम, अनिषा काटकर, ख़िमेश बागडे, कोमल, आदित्य आदि सेवक सेविका यांनी प्रयत्न केले.
More Stories
विश्वशांती परिषदेत भारत-श्रीलंकेतील भंतेदरम्यान करार, श्रीलंकेत उभारणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन
बुद्ध पौर्णिमा 2026 : बुद्ध पौर्णिमेचे महत्त्व, इतिहास आणि कशी साजरी करावी | Buddhist Bharat
मुत्सद्दी स्टोबडन यांनी हिमालयीन बौद्ध धर्मावर एक चिरस्थायी वारसा सोडला आहे.