March 25, 2026

Buddhist Bharat

Buddhism In India

Nashik : माता रमाई महिला मंडळाच्या वतीने माता रमाई भिमराव आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनप्रवासात खंबीर साथ देणाऱ्या, त्याग आणि संयमाची मूर्ती असलेल्या माता रमाई भिमराव आंबेडकर यांची जयंती माता रमाई महिला मंडळाच्या वतीने समता नगर, नाशिक येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या निमित्ताने माता रमाई महिला मंडळाच्या वतीने अभिवादन करून, पुष्पहार अर्पण व विचार प्रबोधन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. उपस्थितांनी माता रमाई यांच्या संघर्षमय जीवनकार्याला अभिवादन करत त्यांच्या त्यागमयी जीवनातून प्रेरणा घेण्याचा संकल्प केला.

बुद्धिस्ट भारत च्या वतीनेसिद्धार्थ भालेराव, सागर वाघ उपस्थित होते बोद्धचार्य आयु. मुकेश पगारे यांनी जयंतीनिमित्त भाषणे, सामाजिक संदेश, माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित प्रबोधन केले आणि माता रमाई भिमराव आंबेडकर यांना जयंती निमित्ताने अभिवादन केले

यावेळी समाजातील कार्यकर्ते, महिला, युवक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माता रमाई यांच्या त्याग, कष्ट आणि बाबासाहेबांना दिलेल्या पाठिंब्यामुळेच भारताला संविधान निर्माता लाभले, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

“रमाईंच्या त्यागातूनच बाबासाहेबांचे स्वप्न साकार झाले” असा संदेश देत कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
याप्रसंगी आयु. रविंद्र पाटील, आयु. राजू पाटील, आयु. विकास जाधव, आयु. सागर पाटील, तसेच महिला मंडळाच्या मान्यवर मोहिनी बागुल, कविता पिल्ले, वनिता पाटील, कविता पगारे, सोनल जाधव, रेखा गायकवाड, मेघा, ज्योती पाटील, दीपिका पगारे, काजल शिंदे, अश्विनी वाकळे, पिल्ले मावशी, शेख भाभी, भालेराव मावशी, नाजुक पाटील आदी महिला उपस्थित होते असे मंडळाच्या वतीने कळवण्यात आले