कोंडाने बुद्ध लेणी ही कर्जत स्टेशन पासून कोंडाने गावाचे अंतर साधारण 12 किलोमीटर असून कोंडाने गावापासून लेणी साधारण 3 ते 4 किलोमीटर अंतरावर आहे, ही लेणी इस पूर्व दुसऱ्या शतकात कोरली असून ह्यामध्ये 16 लेण्याचा समूह आहे. ह्यामध्ये मुख्य चैत्यग्रह, विहार, पाणपोढी असून ह्यामध्ये भिखू निवास आहेत तर काही ध्यान साधना करायला शून्यगार सुद्धा आहेत. जंगल ट्रेक आणि ही ट्रेक माध्यम पाल्याची आहे.
अशोका वॉरियर्स आणि कर्जत लेणी संवर्धक यांच्या संयुक्त विद्यमाने कोंडाने बुद्ध लेणी संवर्धन करण्याचे हे चौथे वर्षे आहे, इथे दरवर्षी प्रमाणे वृक्ष रोपण आणि रस्ता बनवण्याचे काम करीत असते पण ह्यावेळी जरा मुख्य चैत्यग्रह आणि लेणी वरील विहार ह्यावर काम करायचे ठरले होते.
अशोका वॉरियर्स ला सहकार्य करणारे आणि हे काम यशस्वी रित्या काम करणारे विकास धनवे, नरेश जाधव, अरविंद सोनकांबळे सर त्यांच्या बरोबर अशोका वॉरियर्स चे लेणी संवर्धक लगबगिने कोंडाने लेणीवर जाऊन काम सुरु केले, तर अशोका वॉरियर्स मागावून वृक्ष रोपण करीत होते, वृक्ष रोपण मध्ये काही, झाडे आंब्याची, जांभूळ, बांबू, अश्या वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावीत गेली.विशेष म्हणजे ह्यामध्ये महिलाभगिनींचा सहभाग जास्त होता. महिला भगिनींच्या हस्ते वृक्षरोपण तर केलेच पण लेणीवर जे काम केले ते अफलातूनच होते. घमेल फावडे, अगदी एकमेकांच्या हातात देऊन अगदी विहारापर्यंत हे काम करीत गेले. महिला भगिनीचे विशेष आभार 🙏💐
योगायोगाने ABCPR आणि समता सैनिक दलाचे लेणी युनिट चे सैनिक, लेणी अभ्यासक रवींद्र सावंत, श्यामराव सोमकुवर, लक्ष्मण कांबळे सर,विनय जाधव सर हे सर्व आले असता रवींद्र सावंत यांनी बुद्ध लेणीची माहिती देऊन अशोका वॉरियर्स ला छान प्रकारे सहकार्य केले. त्याबद्दल त्यां सर्वांचे मनस्वी आभार.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ह्या लेणी संवर्धन करण्यासाठी, पुणे, हिंगोली वरून बरेचसे लेणी संवर्धक आले होते.
सर्व बंधू भगिनीचे आभार
🙏💐💐💐🙏
अनिल जाधव -लेणी संवर्धक
(अशोका वॉरियर्स)
Join us:-7506223874
अशोका वॉरियर्स आणि कर्जत बुद्ध लेणी संवर्धक यांच्या संयुक्त विद्यमाने कोंडाने बुद्ध लेणीचे संवर्धन
More Stories
नागपूर येथे बामियानच्या बुद्ध पुतळ्याची प्रतिकृती उभारणार Replica of Bamiyan Buddha statue to be built in Nagpur
भीमटेकडीवर जागतिक धम्म परिषदेचा दुसऱ्या दिवशीही उत्साह उसळला., बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या– रामदास आठवले
🌼 दिवस ३ – धम्मपद महोत्सव (मुख्य दिवस) फग्गुण पुन्नमी – पूज्य आचार्य बुद्धरक्षित महाथेर यांची १०४ वी जयंती