June 19, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

कांप्टी येथील आंतरराष्ट्रीय ड्रॅगन पॅलेस टेंपलच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त दोन दिवसीय धम्मोत्सव कार्यक्रम

नागपूर: ओगावा सोसायटी आणि इंटरनॅशनल बुद्धिस्ट कॉन्फेडरेशन ( IBC ) यांच्या संयुक्त विद्यमाने 15 आणि 16 नोव्हेंबर रोजी कांप्टी येथील आंतरराष्ट्रीय ड्रॅगन पॅलेस टेंपलच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त दोन दिवसीय धम्मोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. कार्तिक पौर्णिमा, सकाळी 11 पासून सुरू होईल.
इंटरनॅशनल बुद्धिस्ट फेलोशिप असोसिएशनचे अध्यक्ष कानसेन (निच्यु) मोचिडा या समारंभाच्या अध्यक्षस्थानी असतील. आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघाचे सरचिटणीस खेन्सूर रिनपोचे जंगचूप चोडेन हे विशेष निमंत्रित असतील. ओगावा सोसायटीच्या संस्थापक-अध्यक्षा आणि ड्रॅगन पॅलेस टेंपलच्या प्रमुख सुलेखा कुंभारे आणि विविध बौद्ध राष्ट्रांतील 40 विशेष पाहुणेही उपस्थित राहणार आहेत.
दिवंगत मॅडम नोरिको ओगावा यांना ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा सुलेखा कुंभारे आणि कानसेन मोचिडा यांच्या हस्ते ‘जगविख्यात बौद्ध महाउपासिका’ पुरस्काराने मरणोत्तर सन्मानित करण्यात येणार आहे. नोरिको ओगावा यांची कन्या ताकाको तनाका हिला हा पुरस्कार मिळणार आहे.
सायंकाळी 7 ते रात्री 10 या दोन दिवसांत विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. प्रसिद्ध पावा म्युझिकल ग्रुप 15 नोव्हेंबर रोजी बुद्ध गीतांचा कार्यक्रम सादर करणार असून 16 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता प्रख्यात पार्श्वगायक आदर्श शिंदे बुद्ध आणि भीम गीते सादर करणार आहेत.