🙏भारतीय बौद्ध महासभा🙏
संस्थापक :बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर
राष्ट्रीय अध्यक्षा:आद. महाउपासिका मिराताई आंबेडकर
राष्ट्रीय कार्याध्यक्ष :आद. भिमराव यशवंतराव आंबेडकर
मुंबई प्रदेश
जगामध्ये बुद्ध शासनाने प्रत्येक मानवाचे कल्याण हो या धम्म भावनेने धम्माला वाहून घेतलेला सम्राट
प्रजा ही माझी लेकरे आहेत हे लिखित शिलालेखातून लिहणारा जगाच्या इतिहासात असा एक ही राज्यकर्ता झालेला नाही , प्रजेच्या प्रत्येक समस्या स्वतःपर्यंत पोहचल्या पाहिजेत म्हणून स्वतःच्या अधिकाऱ्यांना त्या समस्या माझ्यापर्यंत पोहचवण्यासाठी कोणत्याची परवानगीची गरज नाही असे सांगणारे एवढेच नाही तर त्यावेळी आपन भोजन करत असू वा शयनगृहात आराम करत असलो तरी देखील मला जनतेच्या समस्या सांगण्यासाठी कोणत्याही परवानगी ची आवश्यकता नाही असे आपल्या सर्वदूर पसरलेल्या साम्राज्यातील प्रत्येक अधिकाऱ्यांना आणि जनतेला देखील तसा राज आदेश लिहून सांगणारे चक्रवर्ती सम्राट अशोक कदाचित या जगातील पहिले चक्रवर्ती सम्राट असतील. आपली प्रजा ही आर्थिक सामाजिक धार्मिक राजकीय दृष्टीने सक्षम झाली पाहिजे म्हणून जनतेला त्यांच्या विकासासाठी लक्ष देणारा सम्राट या जगामध्ये झालेला नाही. देशाचा किंवा एखाद्या राज्याचा जीडीपी तेव्हाच उंचावतो जेव्हा त्या देशातील वा त्या राज्यातील लोकांचा आर्थिक स्तर हा उंचावलेला असतो. हे चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या साम्राज्यातून अभ्यासायला मिळते. सामान्य माणसाला देखील जगाच्या बाजारपेठा निर्माण करून देणारा हा विश्वातील पहिला असा सम्राट आहे ज्याने बाजारपेठा निर्माण केल्या. उद्योग संस्था निर्माण केल्या आणि शासकीय कर्मचारी वाढवून आपल्या राज्यात मोठ्याप्रमाणावर रोजगार निर्माण केले त्यामुळे च सम्राट अशोक यांच्या काळात व्यसनाकडे कोणता तरुण वळलेला नाही. हा इतिहास आज आम्हाला समजून घ्यावा लागेल आणि हे सारे समजून घ्यायचे असेल तर भारतीय बौद्ध महासभा यांच्या माध्यमातून आयोजित चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंतीचे आयोजन या वर्षी मोठ्या जल्लोषात केले जात आहे. तरी सर्वानी मोठ्या संख्यने या कार्यक्रमात हजर राहा
सम्राट अशोक यांचे विविध पैलू सम्राट अशोक यांच्याच अभिलेखातून जाणून घेऊ .
चक्रवर्ती सम्राट अशोक यांची २३२६ वी जयंती निमित्ताने
भारतीय बौध्द महासभा, केंद्र, महाराष्ट्र राज्य,मुंबई प्रदेशचे पदाधिकारी,समता सैनिक दलाचे पदाधिकारी / सैनिक,झोन क्रमांक १,२,३,४,५ आणि ६ चे पदाधिकारी, बौध्दाचार्य, केंद्रीय शिक्षक / शिक्षिका,माजी श्रामणेर , मुंबई प्रदेश अंतर्गत सर्व शाखांच्या पदाधिकाऱ्यांना सुचित करण्यात येते की, चक्रवर्ती सम्राट अशोक यांची २३२६ वी जयंती, अशोक स्तंभ, चैत्यभुमी, दादर येथे शनिवार दिनांक ०९/०४/२०२२ रोजी सायंकाळी ०६.०० वाजता साजरी करण्यात येणार आहे. करीता आपणांस मुंबई प्रदेश कार्यकारिणीच्या वतीने आमंत्रित करीत आहोत. आपण सर्व या कार्यक्रमाला उपस्थित राहावे,हि विनंती.
कार्यक्रमाचे अध्यक्ष – आद. भिमराव यशवंतराव आंबेडकर साहेब,राष्ट्रीय – कार्याध्यक्ष
प्रमुख उपस्थिती
आद. जगदीश गवई, राष्ट्रीय – महासचिव
आद. राजेश पवार, राष्ट्रीय कोषाध्यक्ष
आद.एन.एम.आगाणे, राष्ट्रीय सचिव( पालकमंत्री,मुंबई प्रदेश)
आद.एस.के.भंडारे,स्टॉफ ऑफिसर,
आद.बी.एच.गायकवाड, राष्ट्रीय सचिव
आद. ऍड. एस.एस. वानखेडे, केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख
आयुनि. अलकाताई टेकाळे, केंद्रीय महिला विभाग प्रमुख
आद. भिकाजी कांबळे,अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य
आद. उत्तम मगरे,अध्यक्ष, मुंबई प्रदेश
तसेच केंद्र, महाराष्ट्र राज्य आणि मुंबई प्रदेश आणि समता सैनिक दलाचे सर्व पदाधिकारी / सैनिक.
शनिवार दिनांक ०९/०४/२०२२,संध्याकाळी ०६.०० वाजता , अशोक स्तंभ, चैत्यभुमी,दादर (प)
धन्यवाद! नमो बुध्दाय!! जयभीम!!!
More Stories
आषाढ पौर्णिमा ( गुरुपौर्णिमा ) नागसेन बुद्ध विहार
OKUTTAR LOKUTTARA MAHAVIHAR लोकुत्तर महाविहार येथे एक दिवसीय विपस्सना शिबिराचे आयोजन…
02 March – काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिन