दिक्षाभूमी म्हणजे परिवर्तनाचं नाव !
दिक्षाभूमी म्हणजे प्रबोधनाचं गांव !
हजारो पावलांनी चालत येणारी क्रांती म्हणजे दिक्षाभूमी ,
बुद्धाच्या डोळ्यातून पाझरणारी शांती म्हणजे दिक्षाभूमी ,
कोट्यावधी पाखरांचं घरटं म्हणजे दिक्षाभूमी ,
दाही दिशातून उगवणारी पहाट म्हणजे दीक्षाभूमी .
दिक्षाभूमी म्हणजे माणसास आलेली जाग ,
दिक्षाभूमी म्हणजे मनूस लागलेली आग ,
दिक्षाभूमी म्हणजे न थांबणारे वादळ ,
दिक्षाभूमी म्हणजे निर्णायक परिवर्तनाची चळवळ।
जूलमी परंपरेविरुद्ध रण म्हणजे दिक्षाभूमी ,
मानवी प्रतिष्ठेसाठी दिलेले आव्हाण म्हणजे दिक्षाभूमी।
दिक्षाभूमी म्हणजे बुद्धाने जगाला दिलेली करूणा।
दिक्षाभूमी म्हणजे माणसाने माणसासाठी केलेली प्रार्थना।
दिक्षाभूमी म्हणजे परिवर्तनाचं नाव !
दिक्षाभूमी म्हणजे प्रबोधनाचं गांव !
धम्म चक्र परिवर्तन दिनाच्या सर्वांना मंगलमय हार्दिक शुभेच्छा💐
जय भिम🙏🏻🌹🙏🏻
नमो बुद्धाय🙏🏻🌹🙏🏻
More Stories
बाबा तुम्ही नसतात तर
बुद्धपौर्णिमेचं चांदणं
रात्र ती वैरीण