February 23, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

राजा मिलिंद ( ग्रीक बौद्ध राजा )

King Milind (Greek Buddhist king).

King Milind (Greek Buddhist king).

मिलिंद ( मेनान्डर ) राजाचे राज्य गंधारपासून मथुरेपर्यंत पसरले होते. त्यात गंधार सिंध, पंजाब, काठियावाड आणि पश्चिम उत्तर प्रदेशचा समावेश होता. मिलिंद राजा सागल किंवा साकल म्हणजे हल्लीचे सियालकोट येथून इसवी सनापूर्वी १६१ ते इसव. सनापूर्वी १३० सालापर्यंत राज्य केले. भिक्खू नागसेनाशी धम्मचर्चा केल्यावर त्याने बुद्ध धम्माचा स्वीकार केला. गंधार प्रांतातील बिजौर जवळील शिंकोट येथील उत्खननाद सापडलेल्या लेखात मिलिंद राजाने बुद्ध धम्माच्या प्रचाराच्या कामात मदत केली, असे म्हटले आहे. शिंकोट येथील उत्खननातील एका कलशावर विजय मित्र नावाच्या मिलिंद राजाच्या काळातील एका बौद्ध उपासकाने खरोष्टी भाषेत लेख लिहिला आहे. मिलिंद राजाची काही नाणी सापडली आहेत. त्यावर मिलिंद राजाने स्वतःला ‘धम्मक’ असे म्हटले आहे. त्या नाण्यांवर धम्मचक्राचा शिक्का आहे. यवन (ग्रीक) देशाने धम्म स्वीकारल्यावर मोग्गलिपुत्त तिस्स त्या देशात गेला आणि त्याने योन धम्मरक्खिताला अपरांतक देशात धम्म प्रचारासाठी पाठविले, अशी पालि साहित्यात नोंद आहे.

ग्रीक राजा भारतात येतो धम्म अभ्यासतो धम्माचे तत्व आपल्या देशात घेऊन जातो आणि उन्नती करतो. वर्षानुवर्षे भारतात येऊन स्थायिक झालेले काही देशद्रोही धम्माला बदनाम करून या देशाची भ्रष्ट संस्कृती करून टाकतात आणि बुद्धाला त्यांच्या काल्पनिक, बलात्कारी देवाचा अवतार मानतात आणि तसाच खोटा प्रसार करतात. तरीही असे देशद्रोही या देशात जिवंत आहेत. हे बुद्धाचे, धम्माचे मोठेपणा आहे.