दीक्षाभूमी, नागपूर येथे धम्मसेवेसाठी स्वयंसेवकांची व्यापक नोंदणी
नागपूर | प्रतिनिधी धम्मचक्र प्रवर्तन दिन २०२६ निमित्त नागपूर येथील ऐतिहासिक दीक्षाभूमीवर देशभरातून लाखो बौद्ध अनुयायी सहभागी होणार आहेत. या विशाल धम्ममेळाव्यात येणाऱ्या धम्म अनुयायांची सेवा, सुरक्षितता आणि आवश्यक सुविधा यासाठी ‘स्वयंसेवक जोडो अभियान’ राबविण्यात येत आहे.
लाखो अनुयायांच्या सेवेसाठी पाणी, भोजन, आरोग्यसेवा, मार्गदर्शन, वाहतूक व्यवस्था, निवास, गर्दी व्यवस्थापन तसेच इतर आवश्यक सेवांमध्ये स्वयंसेवकांची महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. या सेवाकार्यात अधिकाधिक युवक, महिला, सामाजिक कार्यकर्ते, धम्मप्रेमी आणि स्वयंसेवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
🙏 धम्मसेवा म्हणजेच मानवसेवा!
दीक्षाभूमी ही केवळ एक ऐतिहासिक वास्तू नसून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीची प्रेरणाभूमी आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने देशभरातून येणाऱ्या लाखो अनुयायांची सेवा करण्याची संधी ही प्रत्येक धम्मप्रेमी नागरिकासाठी अभिमानाची बाब आहे.
या अभियानातून स्वयंसेवकांना विविध सेवा क्षेत्रांमध्ये योगदान देता येणार आहे. शिस्तबद्ध नियोजन, परस्पर सहकार्य, बंधुता आणि सेवाभाव यांच्या माध्यमातून धम्मचक्र प्रवर्तन दिन अधिक सुव्यवस्थित आणि प्रेरणादायी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
💙 चला, धम्मसेवेसाठी एक पाऊल पुढे टाकूया!
“मी स्वयंसेवक क्रांतीभूमीचा…
मी धम्मसेवक दीक्षाभूमीचा…
मी सेवेसाठी सदैव तत्पर!”
ही भावना मनात घेऊन प्रत्येक धम्मप्रेमीने या सेवाकार्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
📝 स्वयंसेवक नोंदणी सुरू
धम्मचक्र प्रवर्तन दिन २०२६ निमित्त सेवाकार्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी खालील नोंदणी फॉर्म भरून स्वयंसेवक म्हणून आपली नोंदणी करावी.
🔗 स्वयंसेवक नोंदणी फॉर्म:
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdIRLGRf6q1ChYlH19LYybC9djE0V15lUXfGDM-_sOo8GjiPw/viewform?usp=publish-editor
🙏 लाखो धम्म अनुयायांच्या सेवेसाठी… आपणही स्वयंसेवक बना!
सेवा हीच धम्माची खरी ओळख!
संघटन • सेवा • समता • बंधुता
आयोजक
कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड प्रतिष्ठान, नागपूर
अधिक माहितीसाठी संपर्क
क्षितिज गायकवाड: 9403714512
रजत महेशगवळी: 8669118116
🪷 Buddhist Bharat विशेष आवाहन
धम्मचक्र प्रवर्तन दिन हा आपल्या इतिहासातील अत्यंत प्रेरणादायी दिवस आहे. या पवित्र दिवशी दीक्षाभूमीवर येणाऱ्या प्रत्येक धम्म अनुयायाची सेवा करण्याची संधी ही धम्मसेवेची आणि सामाजिक बांधिलकीची मोठी संधी आहे.
आपण स्वतः स्वयंसेवक बना आणि आपल्या मित्रांना, कुटुंबीयांना व धम्मबांधवांना देखील या अभियानाशी जोडा.
💙 एक स्वयंसेवक — एक सेवा — एक संकल्प!
💙 चला, धम्मसेवेची ही चळवळ महाराष्ट्रभर पोहोचवूया!
बुद्ध धम्माचा प्रचार, प्रसार करणार राष्ट्रीय मंच — बुद्धिस्ट भारत
🌐 buddhistbharat.in
#धम्मचक्रप्रवर्तनदिन२०२६ #दीक्षाभूमीनागपूर #स्वयंसेवकजोडोअभियान #धम्मसेवा #धम्मसेवक #दीक्षाभूमी #बुद्धिस्टभारत #BuddhistBharat #DhammaChakraPravartanDin #DhammaSeva
More Stories
Mangal Parinay 🌹 बौद्ध वधू-वर सूचक पालक परिचय मेळावा उत्साहात संपन्न
दलाई लामा ९१ वर्षांचे होत असताना, भारत आणि चीन बौद्ध धर्माच्या भविष्यासाठी संघर्ष करत आहेत
थायलंडच्या अपघातात जखमी झालेल्या भिक्षूंच्या देखभाल त्यांना राजेशाही संरक्षणाखाली उपचार पुरवले जातील.