महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने मुंबई पोलीस आयुक्तालय आणि समता सैनिक दल यांची आढावा बैठक घेण्यात आली.
या बैठकीला समता सैनिक दलाचे कमांडर इन चीफ तथा राष्ट्रिय अध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर साहेब उपस्थित होते.
समता सैनिक दलाचे वरिष्ठ अधिकारी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक चैत्यभूमी चे व्यवस्थापक असि. लेफ्टनंट जनरल प्रदिप कांबळे यांची देखील उपस्थिती होती.
येणाऱ्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने देशभरातून येणाऱ्यालाखो करोडो भीम अनुयायांच्या संरक्षणाची जबाबदारी मुंबई पोलीस आणि समता सैनिक दल यांच्या खांद्यावर असते . दरवर्षी प्रमाणे या हि वर्षी समता सैनिक दलाचे जवान आपल्याल महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी समाजाच्या सुरक्षेसाठी त्यांना व्यवस्थित रांगेमध्ये बाबासाहेबांना अभिवादन करता यावे आणि कोणत्याही प्रकारचे गैर कृती होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी दिवस रात्र उभे असणार आहेत.
बाबासाहेबांच्या आदेशाने समता सैनिक दलात सामील होण्यासाठी आपले नाव नोंद करा
https://samatasainikdalindia.org/join-ssd
घर तिथे सैनिक आणि गाव तिथे शाखा
समता सैनिक दल
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आढावा बैठक

More Stories
बुलढाण्यात बुद्ध रश्मी महाविहाराच्या नव्या वास्तूसाठी भूमिपूजन व शिलान्यास सोहळा
बौद्ध भिक्षूंना शांतता प्रयत्नांसाठी युटा सिनेटने मान्यता दिली
नेपाळमधील बौद्धांनी पुरामध्ये बेपत्ता झालेल्या आपल्या कुटुंबीयांसाठी प्रतिकात्मक अंत्यसंस्कार करण्यास सुरुवात केली आहे.