दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौध्द महासभा संस्थापक प.पु. बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर, ट्रस्टी चेअरमन डॉ.चंद्रबोधि जी पाटील, राष्ट्रीय महासचिव माननीय शंकरराव ढेंगरे.
या शिखर संस्थेच्या नाशिक जिल्हा शाखेची बैठक त्रिरत्न बुद्ध विहार सातपुर येथे पार पडली या वेळी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.के.के.बच्छाव गुरुजी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा.वाय.डी.लोखंडे गुरुजी , महाराष्ट्र राज्य महासचिव मा. इंजी.पंकज खरे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. सदर बैठकीत अहमदाबाद येथे विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांना श्रद्धांजली वाहण्यात आली. नाशिक जिल्हा कार्यकारिणीतील काही रिक्त पदे भरण्यासाठी नाव नोंदणी करण्यात आली,
तसेच नाशिक जिल्हा अध्यक्ष मा.संजय भरित गुरुजी यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील अनेक तालुका शाखेचे मान्यवर उपस्थित होते.आयु.संजय भरीत , बबन काळे , एस.एल.काळे , गुणवंत वाघ , नितीन मोरे , संतोष आढाव , दिलीप शाम पगारे , दत्तू वाघ , भागिनाथ पगारे , आयु.नी.मंदाकिनी दाणी ताई , आयु.नि. करुणाताई मगर,अरुण काशीद , उत्तम आढाव , नानाजी पवार , अशोक दामू मोरे , दीपक अहिरे , अतुल दिवे,आयु.नि.कविता शेलार ,संतोष भिसे ,भाऊराव बोरवे,उदय मोहिते ,आयु.सुनील वाघमारे नंदू काळे इत्यादी मान्यवर बौध्दाचार्य उपस्थित होते.
ता.क. जिल्हा कार्यकारणीतील सर्व पदाधिकाऱ्यांनी अजीवन दोन हजार रुपये भरून सभासद होणे असा ठराव पास करण्यात आला.
More Stories
Buddhist Circuit : बौद्ध सर्किट भेटींना चालना देण्यासाठी आंध्र प्रदेशने व्हिएतनामशी करार केला
भगवान.बुद्ध एक भौतिकशास्त्रज्ञ – अनिल वैद्य, माजी न्यायाधीश
Nashik : दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने वर्षावास ते पन्ना व दिवस कार्यक्रम संपन्न