Dhamma Chakra Pravartan Din 2023 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरला १४ ऑक्टोबर १९५६ रोजी लाखो अनुयायींसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. तो दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो. मुख्य कार्यक्रम नागपूरच्या दीक्षाभूमीत होत असला तरी मुंबईच्या चैत्यभूमीत आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने जमतात.
(ता. २४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी घेतलेल्या धम्म दीक्षेला आज ६७ वर्षे उलटून गेले. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दादरच्या चैत्यभूमीवर (Chaityabhoomi Dadar) आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी हजारो अनुयायींनी गर्दी केली होती. त्यांच्या सोयीसाठी पालिका आणि पोलिस प्रशासनाने चोख व्यवस्था केली होती.
दर्शनाताई भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते ध्वजवंदन : सकाळपासून एक लाखांच्या वर नागरिकांनी बाबासाहेबांच्या स्मृतीचे दर्शन घेतले, अशी माहिती चैत्यभूमीचे व्यवस्थापक प्रदीप कांबळे यांनी दिली. सकाळी ९.१५ वाजता संस्थेच्या अध्यक्षा दर्शनाताई भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमांचा १०० टक्के खप : चैत्यभूमीवर हजारो अनुयायी जमले होते. त्यामुळे पुस्तकाला मोठी मागणी होती, असे चैत्यभूमीवरील पुस्तक विक्रेते अनिल खैरे यांनी सांगितले. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, भारतीय संविधान व बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या पुस्तकांची चांगली विक्री झाली, असे त्यांनी सांगितले. गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांच्या प्रतिमांचा १०० टक्के खप झाला, असे विक्रेते सूरज शेलार यांनी सांगितले.
Buddhism | Buddhist Bharat | Mumbai | Dhammachakra Pravartan Din
More Stories
नागपूर येथे बामियानच्या बुद्ध पुतळ्याची प्रतिकृती उभारणार Replica of Bamiyan Buddha statue to be built in Nagpur
भीमटेकडीवर जागतिक धम्म परिषदेचा दुसऱ्या दिवशीही उत्साह उसळला., बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या– रामदास आठवले
🌼 दिवस ३ – धम्मपद महोत्सव (मुख्य दिवस) फग्गुण पुन्नमी – पूज्य आचार्य बुद्धरक्षित महाथेर यांची १०४ वी जयंती