June 19, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

मणिपूर येथील महिला विटंबनेच्या घटनेच्या निषेधार्थ नाशिकमध्ये सामाजिक संघटनेचा मोर्चा

आम्हाला मणिपूरमध्ये शांतता हवी आहे, नराधमांना अटक करा, मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा, मणिपूरमध्ये शाळांवर होणारे हल्ले थांबवा, अशा विविध आम्ही घोषणांचे फलक हातात घेऊन शेकडो नागरिकांनी भरपावसात मूकमोर्चा काढून मणिपूरच्या घटनेचा निषेध
७० मणिपूरचा प्रश्न धुमसत असून दोन महिलांची नग्न धिंड काढण्याचा प्रकारही या ठिकाणी घडला आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी भारताचे लोक या संस्थेच्यावतीने मंगळवारी (२५) सायंकाळी मूकमोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. अनेक नागरिक रेनकोट घालून तर काही छत्या घेऊन मोर्चात सहभागी झाले होते. शिवाजी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळून मोर्चास सुरुवात झाली. नेहरू गार्डन, मेहेर चौक मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचला.

बेटी बचाव बेटी पढावच्या खोट्या घोषणा करणारे मोदी सरकार मुर्दाबाद निवेदनात करण्यात आलेल्या मागण्या गप्प का ?
WE STAND WITH MANIPUR
मणिपूर येथील महिला विटंबनेच्या घटनेच्या निषेधार्थ नाशिकमध्ये सामाजिक संघटनांनी काढलेल्या मोर्चात सहभागी झालेले संवेदनशील नाशिककर, नराधमांना अटक करा, राष्ट्रपती राजवट लागू करा फलकांनी वेधले आंदोलनाचे लक्ष : मणिपूर घटनेच्या निषेधार्थ शहरात मूकमोर्चा मणिपूरचे राज्य सरकार त्वरित बरखास्त करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न असफल झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत निवेदन करावे व गृहमंत्री अमित शहा यांचे पद काढून घेऊन त्यांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, येथील घटनेची त्वरित चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करण्यात यादी, आदी विविध मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

मोर्चात विविध महिला संघटनांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्या आणि पुरोगामी चळवळीतील विविध पक्ष आणि संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. मोठ्या प्रमाणात कार्यकत्यांची उपस्थिती असली तरी मोर्चात कोणत्याही घोषणा देण्यात आल्या नाहीत, येणाऱ्या जाणारांचे लक्ष वेधून घेत होते. मार्चच्यावतीने भारताच्या राष्ट्रपती आणि मणिपूरचे राज्यपाल यांच्या नावाने जिल्हाधिकायांना निवेदन देण्यात आले. विविध पदाधिकन्यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.

मणिपूर घटनेवर मौन बाळगणाचा केंद्र सरकारच्या निषेधार्थ तोंडाला काळी पट्टी बांधून निषेध नोंदविणाऱ्या बालिका दिसून आल्या