मिरज बेडग (ता. मिरज) येथील आंबेडकरी समाजातील सुमारे १५० कुटुंबांनी मंगळवारी गाव सोडून मुंबईकडे कूच केली. भर पावसात निळ्या ध्वजांसह महिलादेखील मोठया संख्येने लाँग मार्चमध्ये सहभागी झाल्या आहेत. गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान पाडणाऱ्यांवर कारवाईची मागणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे करणार आहेत.
बेडममध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान भाजपची सत्ता असलेल्या ग्रामपंचायतीने एक महिन्यापूर्वी जमीनदोस्त केली. यामुळे ग्रामपंचायत विरुद्ध आंबेडकरी समाज असा संघर्ष सुरु आहे. ग्रामपंचायतीने कमानीसाठी परवानगी दिली होती. मात्र, ती बेकायदा असल्याचे ठरवून १६ जून रोजी पाडून टाकली. जिल्हाभरातील आंबेडकरी समाजाने याचा तीव्र निषेध केला. कमान पाडल्यापासून गावातील वातावरण धगधगते असून वार-प्रतिवार सुरु आहेत.
पालकमंत्री, खासदारांचा प्रशासनावर दबाव : ग्रामपंचायतीत भाजपची सत्ता आहे. त्यामुळे पालकमंत्री सुरेश खाडे व खासदार संजय पाटील प्रशासनावर दबाव टाकत असल्याचा आरोप आदोलकांचे नेते डॉ. महेशकुमार काय यानी केला, बेमुदत उपोषण सुरू केल्यानंतर जनसुराज्य वगळता कोणत्याच पक्षाच्या आदोलकाना भेटण्याचीही तसदी घेतली नसल्याचे ते म्हणाले.
पहिला मुक्काम मिरजेत :मंगळवारी दुपारी मिरजेत पोहोचल्यानंतर आंदोलकानी डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या पुतळ्यासमोर ठिय्या मारला, जमावामुळे पोलिसाना वाहतूक वळवावी लागली. पहिला मुक्काम मिरजेत करण्याचे ठरले. त्यानुसार निवासाची, भोजनाची तजवीज करण्यात आली.
न्याय मिळवण्यासाठी अंथरुण-पांघरुण साहित्य सोबत घेऊन पायपीट : कमान पाडणाऱ्या ग्रामपंचायत पदाधिकान्यावर कारवाईसाठी प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले होते. मात्र, प्रशासन त्यांना पाठीशी घालत असल्याचे आंदोलकाचे म्हणणे आहे. प्रशासनाने बैठक घेऊन तोडण्याचा प्रयत्न केला पण तोडगा निघाला नाही, बेडगमधून दुपारी बाराच्या सुमारास पोलिस बदोबस्तात आंदोलकांनी मुलेबाळे, अथरुण-पांघरूण, कपडे व संसारोपयोगी साहित्यासह गाव सोडले आहे. भर पावसात दुपारी तीन वाजता आंदोलक मिरजेत पोहोचले. निळे ध्वज फडकवत महिला, मुले अग्रभागी होती.
गेल्या आठवड्यात मिरजेत समाजाची बैठक झाली. त्यामध्ये मंगळवारी सकाळीच महिला-पुरुष मंत्रालयावर लॉग मार्च काढण्याचे निघाले आहेत. काही वाहनामध्ये ठरले. संतप्त समाजाने थेट गाव महिला, मुले व आंदोलकांच्या सोडण्याचा निर्धार केला. त्यानुसार साहित्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ठोस निर्णय झाल्याशिवाय गावाकडे परतायचे नाही या भूमिकेतूनच आंदोलक मुंबईसाठी रवाना झाल्याचे दिसून आले.

More Stories
कोलकाताच्या प्रसिद्ध पुजा पंदालमध्ये भारत आणि चीनच्या बौद्ध वास्तुकलेचा अनोखा संगम; अजिंठा लेणी आणि लुमंग गुहेची कलाकुसर ठरतेय आकर्षणाचे केंद्र
तेलंगणातील ऐतिहासिक नेलाकोंडापल्ली बौद्ध स्थळाचा कायापालट; जागतिक पर्यटन केंद्र बनवण्यासाठी ४.२६ कोटी रुपयांची तरतूद
बुलढाण्यात बुद्ध रश्मी महाविहाराच्या नव्या वास्तूसाठी भूमिपूजन व शिलान्यास सोहळा