November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

अक्षय भालेराव बाबत त्यांच्या मृत्यूपश्चात सोशलमिडीयात बदनामीकारक मजकूर लिहणाऱ्यांची पोलीस चौकशी करणार ! एडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आयु. प्रकाश आंबेडकर यांनी नांदेड येथे अक्षय भालेराव याची हत्या झाली त्यांच्या परिवारास भेट देऊन आरोपीना कठोर कारवाई करण्यास आम्ही भक्कम पणे आपल्या सोबत आहोत असे कळविले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती केल्यामुळे अक्षय भालेरावचि हत्या करण्यात आली आणि आता पुन्हा त्या विरोधात मीडिया माध्यमातुन बदनामी करण्याचे चे पोस्ट करत आहेत ते सदर खून प्रकरणात सहभागी आहेत का पोलिसांनी याची सखोल चोकशी करावी त्याबाबद आमचे कार्यकर्ते पुरावा मिळवून देण्यास मदत करतील असे त्यांनी सांगितले

अक्षय भालेरावचा जातीयवादी किड्यांनी अतिशय निर्घृणपणे खून केला. मात्र आज सोशलमिडीयात अक्षय विरोधात चुकीचे बदनामीकारक स्टेटमेंट जातीयवाद्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून व्हायरल केल्या जात आहे. याची नोंद घेण्यात आली आहे. आता काही वेळापुर्वी बोंडार येथे जाऊन मा बाळासाहेब आंबेडकर यांनी दिवंगत अक्षयच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी उपस्थित कुटुंबीय, गावकरी, कार्यकर्त्यांना संबोधित करताना मा बाळासाहेबांनी सांगितले की, जे अक्षय बाबत बदनामीकारक मजकुर सोशलमिडीयात लिहीत आहेत त्यांची चौकशी पोलीस जरूर करतील.कारण ते अक्षयला ओळखत असावेत, त्यांचा या खूनाशी संबंध आहे म्हणूनच ते लिहीत असावेत.म्हणून त्यांची सुध्दा सखोल चौकशी करण्यात येईल.

( कृपया: अक्षयच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा या उद्देशाने जे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते या केसवर दिवसरात्र मेहनत घेत आहेत अशांनी अक्षय बाबत खोडसाळपणे मजकूर व्हायरल करणाऱ्यांच्या फेसबुक अकाऊंटचे स्क्रीनशॉटस् काढून ते पुरावा म्हणून पोलिसांच्या हवाली करावेत.)