बुद्धविहारातली तुझी मुर्ती त्वेषाने हसली।
जेव्हा बा भिमा तुझ्या जयंतीसाठी मीटिंग बसली ।।
काय अन् कसे बघावे
तुझ्या लेकरांचे राजकारणी कावे
सचिव, अध्यक्ष, उपाध्यक्ष
पदासाठी उमेदवारी दावे
तुझ्या विचाराची प्रतिमा एकातही नाही दिसली ।।
बघितलेस तु त्यांचे हेवे दावे
त्यांची उर्मटपनाची भाषा
जणू जयंती नाहीच तुझी
आहे कुठला तमाशा
भिमा तुझी विचारगंगा या गटारात फसली ।।
कोनी म्हणतय लावा आँर्केस्टृा
कोनी म्हणतय लावा डिजे, बाजा
भिंगरी बहाद्दर होउन डिस्को करुन
करु म्हणे मोठा गाजा – वाजा
तु ओढलेली मर्यादेची रेष यानी मात्र पुसली ।।
जयंती म्हणजे लागत फक्त
डिजेपुढ नाचायला
कोनीच तयार होइना
विचार तुझे वाचायला
नाच नसला तर म्हने मजा येनार कसली ।।
तुझा संघर्षमय इतिहास वाचावा
पुढच्या पिढिंना कळावा
भिम सैनिक हा शांतप्रिय होउन
बुद्ध धम्माकडे वळावा
असा कार्यक्रम घ्या म्हंटल तर यांना जसी नागिन डसली ।।
तुच बसवलय यांना माणसात
याची त्यांना जाण कोन देइल
असे असले तुझे वारसदार
तुझा रथ पुढे कोन नेइल
सांगुन सांगुन त्याना माझ्यासारख्यांची जीभ घसली ।।
जेव्हा भिमा तुझ्या जयंतीसाठी मीटिंग बसली ।।
🙏 जय भिम 🙏

More Stories
दिशादर्शक Dishadarshak
वसविले गाव मी
बाबा तुम्ही नसतात तर