June 19, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

आज पासून नवा संकल्प करूया । बौद्ध संस्कृती आपली जतन करूया ।।

आज पासून नवा संकल्प करूया ।
बौद्ध संस्कृती आपली जतन करूया ।।

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला बुद्ध धम्माचा मार्ग गतिमान करूया ।
गट-तट, संघटनांमध्ये विखरुलेल्या बांधवांना एक करूया ।।

एकत्र या बांधवांनो अजूनही वेळ गेलेली नाही,
तथागतांच्या चरणी नतमस्तक होऊ या ।।
जग सारे येईल आपल्या मदतीस धावुनी,
आधी आपल्या घरापासून २२ प्रतीज्ञांचे पालन करूया ।।

का लागतोस दगड-धोंड्याच्या काल्पनिक देवा मागे,
अरे स्वीकार तथागतांनी दिलेली समतेची शिकवण ।।

ना कोणी उच्च, ना कोणी निच, समानतेचा मंत्र आचरणात आणूनी जाऊया त्रिशरण । पंचशील, अष्टांगीक मार्गाचे अनुसरण करूया ।।

बुद्ध धम्मानेच होईल जीवन आमुचे सफल,
बुद्ध लेणी, बुद्ध विहार, पाली भाषेचे पुन्हा जतन करूया ।।

चला पुन्हा एकदा
आज पासून नवा संकल्प करूया ।
बौद्ध संस्कृती आपली जतन करूया ।।

बुद्धम् नमामि 🙏
धम्मम् नमामि🙏
संघम् नमामि 🙏

🔹धम्म प्रचार-प्रसार करण्यासाठी प्रसिद्ध : बुद्धिस्ट भारत
लेखन ( सादरीकरण ) : संघमित्रा मोरे