डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती (रजि.),नवी मुंबई
संस्थापक अध्यक्ष आद.चंद्रकांतदादा जगताप यांच्या वतीने गेल्या १० वर्षापासून जीवनगौरव तसेच समाजभूषण पुरस्काराने समाजातील विविध स्थरावर उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना सन्मानित केले जाते.
समाजात अनेक संघटना पंचिकृत असून हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या संस्था- संघटना सर्वसामावेश सामाजिक कार्य करत असतात. यातील सर्वात उल्लेखनीय कार्य करणारी संस्था म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती (रजि.),नवी मुंबई संस्था होय , या संस्थेचे कार्यसम्राट संस्थापक अध्यक्ष आद.चंद्रकांतदादा जगताप साहेब आणि त्यांचे सहकारी या प्रकारे उपक्रमाचे नियोजन करीत आसतात या त्यांच्या कार्यास निळा सलाम आद आद.चंद्रकांतदादा जगताप साहेब आपले मनःपुर्वक💐💐💐 अभिनंदन.
आपण बाभिमाच्या वैचारिक सैनिकांची माळ गुंफत आहात . आपण या वर्षी उपरोक्त संस्थेच्या वतीने सामाजिक कार्याची दखल घेऊन २०२१/२२ या वर्षाचा जीवनगौरव पुरस्कार देऊन समाजातील अनेक पैलूंवर कार्य करणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतील प्रसिद्धी पासून दूर असणाऱ्या अनेक शिलेदारांच्या कार्याचा गुणगौरव करून जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात केलात. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार समाजातील विविध पैलूंवर क्रियाशील दिग्दज कार्यकर्ते , जेष्ठ साहित्यीक विचारवंत , कलाकार , साहित्यिक,कार्यकर्ते कोविदच्या पादुर्भावाचे सरकारी नियमाचे पाळण करून उपस्थितीत राहिले.
महार इनाम ६ ब जमिन बचाव समितीचे अध्यक्ष आद आयु. सयाजी वाघमारे साहेब यांना डॉ . बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती (रजि.) नवी मुंबई ह्या संस्थेच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार देवून त्यांच्या सार्वजनिक कार्याचा गुण गौरव करण्यात आला .
सरांनी सन १९७० साली एम.एस.मंडपे, बी.डी. बागूल इ .सहकाऱ्यांच्या मदतीने विक्रीकर खात्यात मागासवर्गीयांची संघटना स्थापन केली. महाराष्ट्रात कोणत्याही शासकीय कार्यालयात दिसणार नाही.असे भव्य डॉ .बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय , वाचनालय आद.आयु.सयाजी वाघमारे आणि त्यांचे सहकारी मित्र निरंजन वंजारी , रमेश चक्रे , सुरेश लोखंडे , यांच्या पुढाकाराने निर्माण झाले . पदोन्नती मध्ये आरक्षण म्हणून अपर विक्रीकर आयुक्त पदावर महाराष्ट्रात पहिला अनु.जातीचा उमेदवार मागासवर्गीयांच्या संघटनेमुळे झाला .
सन १९७२ साली स्थापन झालेल्या दलित पॅन्थर आणि अनु .जाती -जमातीचा परिसंघ अध्यक्ष रामराज आताचे उदितराज, प्रा. इंदिरा आठवले हे ह्या
संघटनांना आद. आयु. सयाजी वाघमारेच्या पुढाकाराने फार मोठे पाठबळ देण्यात आले . महाराष्ट्र उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली .
गव्हेमेंट कॉलनी बांद्रा ( पू . ) ह्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत आज जे प्रज्ञा सांस्कृतिक केंद्र ( त्रिरत्न बुध्द विहार ) ह्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आद. आयु. सयाजी वाघमारे आणि त्यांचे सहकारी प्रकाश सोनावणे , सुरेश गायकवाड ( जी.टी.एस.), जगदिश कोसे , एस . डी . पाईकराव , विठ्ठल कांबळे , दिनकर जाधव , एल . एस . गायकवाड ह्या सर्वांच्या ( अधिकारी – कर्मचारी ) सामूहीक कार्याचे प्रतिक आहे .
सयाजी वाघमारे ह्यांचा पिंड सार्वजनिक कार्याला वाहून घेण्याचा असल्यामुळे सेवानिवृत्ती नंतर रिपब्लिकन पक्ष( खोब्रागडे ) गटाचे ते दहा वर्षे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळीत होते. महार इनाम ६ ब शेतजमिन बचाव कार्यक्रम हाती घेतल्यामुळे त्यांना पक्ष सोडावा लागला . तरी आज देखील त्यांचे हे काम चालू आहे .
ही सर्व कामे करित असतांना अभ्यासू , विचारवंत , लेखक म्हणून ‘ घडल हे असं दलित पँथर कार्यकर्त्यांची व्यक्तीचित्र , लोकशाहीच्या रक्षणार्थ – डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे खुले पत्र ‘महार इनामी जमिनी , भावकी ‘ हे वैचारीक लेख ,.’ एका भिम सैनिकाचे पतन ‘ कादंबरी आणि आगामी पुन्हा दलित पँथर , येसकर हा त्यांचा लेखन प्रवास चालूच आहे .
सन २०१२ साली महाराष्ट्र शासनाने त्यांना समाज भूषणपुरस्काराने गौरविले आहे . त्यांच्या कार्याचा चित्रपट फार मोठा असून देखील प्रसिध्दी पासून ते लांब आहेत .
सर, आपल्या सन्मानपूर्वक पुरस्कारा बद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन . 💐 पुढील वाटचालीस आभाळभर सदिच्छा 💐 असेच समाजहिताचे कार्य करण्यास आपणांस निरोगीमय, शांतीमय, दिर्घ आयुष्यमान लाभो या मंगल कामना👏👏👏
या कार्यक्रमात समाज पुरस्कारांने सन्मानित केलेले सर्व मान्यवरांचे मनःपुर्वक अभिनंदन. असेच सामाजिक कार्य दुगुणीत व्हावे याच सदिच्छा.
💐💐💐
✒️विलास पवार , रायगड
91 37 66 2424
🥀🌾🥀🌾🥀🌾🥀🌾🥀🌾🥀




More Stories
दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ट्रस्टी चेअरमन डॉ.चंद्रबोधि जी पाटील यांच्या शिखर संस्थेचा नाशिक जिल्हा शाखेची बैठक त्रिरत्न बुद्ध विहार सातपुर येथे पार पडली
अशोका वॉरियर्स आणि कर्जत बुद्ध लेणी संवर्धक यांच्या संयुक्त विद्यमाने कोंडाने बुद्ध लेणीचे संवर्धन
Tashi Dolma didi ज्येष्ठ धम्म प्रचारक ताशी डोल्मा यांचे निधन