नाशिक रोड प्रतिनिधी आज दि. 3/8/20205 रोजी संभाजी नगर बोरमळा रेल्वे ट्रॅक्शन येथील दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या नुतन इमारत कोनशिला उद्घाटन सोहळा प्रमुख मुख्य अतिथी डॉ. रोहीत पिसाळ चेअरमन बुद्धिझम अर्बन मल्टिपल लिमिटेड संस्थापक क्युशा गोल्ड कंपनी जगातील दोन नंबर वरील सुवर्ण खान आशिया पॅसिफिक ट्रेझर आयु थापा मॉनिस्ट्री यांच्या हस्ते पार पडला.
या उद्घाटन समारंभाच्या सुरुवातीला प्रमुख अतिथींचा सत्कार करून मुख्य अतिथींच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना धुप दिप प्रज्वलित करून बुद्ध भिक्खु महेंद्र बोधी यांनी बुद्ध वंदना म्हणुन केली या सोहळ्याचे अध्यक्षस्थान नितीन डांगळे सर बो.बा संस्था सरचिटणीस बी एस आय नाशिक रोड अध्यक्ष तसेच उद्घाटन समारंभाला प्रमुख उपस्थिती डॉक्टर सुजाता त्रिभुवन विभागीय अधिकारी नाशिक रोड, जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक नारोड, सिद्धार्थ इंगोले सर अध्यक्ष बोधी बहुद्देशीय संस्था तथा बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल पाथर्डी, योगिता थोरात मुख्याध्यापिका बुद्धिसी इंटरनॅशनल स्कुल ना.रोड उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे अशोक जगताप अरुण भदरंगे चंद्रभामा केदारे, सुहास पवार सेवानिवृत् अधिकारी अनिल मोरे,प्रमिला घोगरे मॅडम जितेंद्र साळवे, मीनाताई गांगुर्डे मॅडम कार्यक्रमाचे निमंत्रक राजाभाऊ सोनवणे राजेश जाधव सुषमाताई उबाळे दीप्ती सोनवणे मॅडम वैशालीताई जाधव अर्चना जाधव मॅडम यांच्या उपस्थिती संपन्न झाला
या उद्घाटन समारंभाचे प्रमुख अतिथी डॉक्टर रोहित पिसाळ यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की एक काळ होता की आपल्या गळ्यात मडके होती पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रम आणि विदवते मुळे मी आज गळ्यात सोन्याचे एक किलोचे बुद्धाचे रूप गळ्यात घालून मोठ्या रुबाबदार पणे पूर्ण देशात फिरतो ही पुण्याई डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची त्यामुळे यांना मी बाप मानतो त्यांनी आपल्या सर्वांना अमूल्य असा शिक्षणाचा मूलमंत्र दिला तो मी जीवनात आमलात आणून त्यावर चालतो म्हणून मी आज सोन्याच्या खाणीचा मालक तसेच बुद्धीझम अर्बन मल्टिपल निधी लिमिटेड या संस्थेचा चेअरमन सुद्धा आहे याचे एकमेव कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. आपण सुद्धा तो शिक्षणाचा मुलमंत्र सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी आचरणात आणून एक इतिहास घडवू शकतात त्यासाठी पालकांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे विद्यार्थी चांगला होऊ शकतो हे उदा.याशाळेचे विद्यार्थी आणि शिक्षकआहे यांचे खरच कौतुक करावे तितके कमीच आहे मगाशी लहान मुलांचे डान्स व संविधानाचे कलम बिनचूक सांगत या मुलांनी खरंच दाखवून दिले की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचा दिलेला मुल मंत्र खरच अनमोल असा आहे त्याची आपण जपवणूक करून त्याप्रमाणे पुढील वाटचाल करावी पुढील काळात या संस्थेने स्कुल चे कॉलेजमध्ये रूपांतर होईल यात शंका नाही या संस्थेच्या कॉलेज च्या मोठ्या इमारत उद्घाटनासाठी मी जरूर येईल असे मनोगत व्यक्त केले.
तसेच आपल्या अध्यक्षीय भाषणात नितीन डांगळे सर यांनी सांगितले की बुद्धिश इंटरनॅशनल स्कूल ची सुरुवात एका लहानशा पत्र्याच्या खोलीतून केली प्रथम नर्सरी ज्युनिअर ची सुरुवात करून हळूहळू सीनियर स्कूल सेकंडरी स्कूल अशी सुरुवात करून आज स्वतःची इमारत झाली त्याचे एकमेव कारण शिक्षकांची साथ आणि पालक वर्ग यांनी ठेवलेला विश्वास म्हणून पालकांनी या शाळेत आपल्या पाल्यांना आणि आजूबाजूच्या नातेवाईकांना स्कूलमध्ये त्यांच्या मुलांना जास्तीत जास्त ऍडमिशन घेऊन सहभाग द्यावा असे सांगितले.
या कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचालन सुषमा उबाळे तर आभार प्रदर्शन थोरात मॅडम यांनी केले. यावेळी गोल्ड मॅन डॉ. रोहीत पिसाळ यांचा काही पालकांनी शाल आणि अशोकस्तंभाचा मोमेंटो देऊन सत्कार केला. उद्घाटन समारंभाला शिक्षक वृंद शालेय शिक्षण समिती पालक शिक्षक संघ पालक वर्ग यांनी उपस्थित राहून शुभेच्छा देवून शोभा वाढविली.
नाशिक प्रतिनिधी : शाशिकांत दा.भालेराव.
More Stories
✨ धम्म प्रचार प्रसार सेवा सहयोग सहकार्य आवाहन Donate For Dhamma Prachar
दलाई लामा यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त १३ जुलै रोजी नवी दिल्लीत जागतिक बौद्ध परिषद होणार आहे.
पांगी फोरमने पंतप्रधान जन विकास कार्यक्रमांतर्गत बौद्ध गावांचा समावेश करण्याची मागणी केली आहे.