पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने नाशिकरोड या ठिकाणी महाकवी वामनदादा कर्डक जयंती व स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उन्हवणे यांनी शोषित कलावंतांसाठी वामनदादांच्या गाण्यांना आणि काव्याना गायनातून आंबेडकरी विचारांच्या प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.यात अनेक कवी गायक व कलावंतांनी वामनदादांचे गाणी गाऊन त्यांना अभिवादन केले.
प्रख्यात गायक कवींच्या वतीने वामन दादांच्यासहित सर्व महापुरुषांना पुष्प अर्पण केले,यावेळी महाराष्ट्राचे नावाजलेले कवी व गायक रंगराज ढेंगळे,सोमनाथ गायकवाड,जयपाल धिवरे,हर्षेंद्र जाधव,दीपक शिंदे,शिरीष गांगुर्डे,रवी वाघमारे,युवराज शिंदे,रोहित उन्हवणे,संजय उन्हवणे,सुनील उन्हवणे,विकी उन्हवणे,अनिल जगताप,भारत भालेराव,संकेत गांगुर्डे,स्वप्नील गायकवाड व इतर कलावंतांनी सहभाग दिला,कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी,जिल्हाध्यक्ष शशीभाई उन्हवणे,महेश भोसले,रवी पगारे,प्रवीण कर्डक,नंदू जाधव,प्रशांत कर्डक,आनंद पगारे,विकी पगारे,हर्षल मोरे,आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.
More Stories
भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष, भारत सरकारच्या प्रयत्नांमुळे १२७ वर्षांनी भारतात परत येऊ शकले
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारक येवला कामासंदर्भात आज मुंबईत मंत्रालयात आढावा बैठक
भारताचे सॉफ्ट पॉवर टूल म्हणून बौद्ध धर्म: दक्षिणपूर्व आणि पूर्व आशियामध्ये पंतप्रधान मोदींचे डिप्लोमॅटिक प्लेबुक