February 23, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड विमानतळ(ओझर)नाशिक नामकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

नाशिक ( प्रतिनिधी ):-कर्मवीर दादासाहेब गायकवाड विमानतळ ओझर नामकरण समितीची महत्वपूर्ण बैठक आज दिनांक 11 जुलै 2021 रोजी नाशिक येथे समितीचे मुख्य निमंत्रक अण्णासाहेब कटारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होऊन बैठकीत नाशिक जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी ( मंत्री,खासदार,आमदार ) यांना समक्ष भेटून ओझर येथील विमानतळास कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव देणे बाबत मागणीनामा सादर करण्याचे ठरविण्यात आले.
👉🏻त्याप्रमाणे समितीने पुढील कार्यक्रमाची रूपरेषा ठरवून लगेचच लोकप्रतिनिधींच्या गाठीभेटी सुरू करण्याचा ठराव देखील पारित करण्यात आला.बैठकीस समितीचे
विलास पवार,बाळासाहेब शिंदे,शशिकांत भाई उन्हवणे,दि.ना.उघाडे,मदन अण्णा शिंदे,दिपचंद नाना दोंदे,संजय जी साबळे,आदेश भाऊ पगारे,अनिल भाऊ आठवले,कैलासजी तेलोरे,बाळासाहेब साळवे ,किशोर भाऊ गांगुर्डे,विजय भाऊ वाहूळे,दिलीप अहिरे,पंडित भाऊ नेटावटे,प्रतीक भाऊ सोनटक्के,मिलिंद भाऊ निकम,हेमंत भाऊ अहिरे,बिपिन कटारे,प्रशांत कटारे,प्रशांत शिंदे* आदी उपस्थित होते.