February 24, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

महिला सक्षमीकरण काळाची गरज – प्रकाश पगारे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संकल्पित रिपाई च्या वतीने विभागीय महिला मेळावा मोठ्या उत्सहात यशवंत सभागृह म्हसरूळ येथे संपन्न झाला . कार्यक्रमाच्या प्रारंभी महापुरुषाचें प्रतिमेचे पूजन करीत मान्यवरांचे स्वागत करण्यात आले .यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संकल्पित रिपाई पक्षप्रमुख प्रकाशजी पगारे सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले .
महिला सबलीकरण व सक्षमीकरण काळाची गरज असून येत्या काळात विविध सरकारी योजना तळागाळात कशा पोहचवण्यात येव्यात यासंदर्भात माननीय मुख्यमंत्री यांच्या समवेत भेट घेऊन महिलांचे प्रश्न प्रभावी पणे मांडणार आहोत , महिला व बालकल्याण मंत्रालयातला निधी वेळेत सर्वसामान्य नागरिकांना पर्यंत पोहचत नाही यावर शासनाचे लक्ष वेधणार असून महिला कौशल्य विकास कार्यक्रम संकल्पित रिपाई च्या माध्यमातून राबविण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या याप्रसंगी महिला जिल्हाप्रमुख रेखा ताई शेलार , शहराध्यक्ष चंद्रकला ताई बोरुडे , उपजिल्हाप्रमुख रत्नाकर निकम , ज्ञानेश्वर पाटील , जयश्री परदेशी, अफसाना शेख , वैशाली परदेशी , उज्वला मिरेकर आदी महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .