महिला समृध्दी योजना या योजनेअंतर्गत दिव्यांग महिला कोणताही लघु उद्योग, सेवा उद्योग, प्रक्रिया उद्योग, वस्तू उत्पादन उद्योग, गृह उद्योग करू शकते. मुख्यत्वे करून दिव्यांग महिलांचे स्वावलंबनाकरीता प्राधान्य दिले जाते. तसेच दिव्यांग महिलांना व्याजदरामध्ये १% सुट दिल्या जाते.
| वार्षिक व्याजदर | |
|---|---|
| रुपये ५०,०००/- पर्यंत | ४% |
| रुपये ५०,०००/- ते रुपये ५ लाख पर्यंत | ५% |
| रु. ५ लाखापेक्षा जास्त | ७% |
| परत फेडीचा कालावधी | ५ वर्षे |
| लाभार्थ्याचा सहभाग | ५% (१ लक्षावरील कर्ज प्रकरनाकारिता) |
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे
- मूळ विहित नमुन्यातील अर्ज पूर्ण तया भरलेला असावा.
- १५ वर्षे महाराष्ट्रात वास्तव्य असल्या बाबतचा दाखला / डोमिसाईल सर्टीफिकेट
- वयाचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला (वयाच्या पुराव्याबाबत कागदपत्रे)
- दिव्यांगत्वाचा दाखला (साक्षांकित केलेली सत्यप्रत)
- निवडणूक आयोगाने दिलेल्या ओळखपत्राची प्रत/आधार कार्ड /पॅन कार्ड किवा दिव्यांग ओळखपत्र
- पासपोर्ट साईज व पूर्ण आकारचा फोटो (अर्जावर चिकटविण्यात यावेत)
- जागेच्या उपलब्धतेचा पुरावा (जागा स्वत:ची असल्यास कर पावती, नातेवाईकाची असल्यास संमतीपत्र, भाडयाची असल्यास भाडेकरार नामा)
- कर्जबाजारी/ वित्त संस्थेचा थकबाकीदार नसल्याबद्दल प्रतिज्ञापत्र (रुपये १००/- च्या स्टॅम्प पेपरवर)
- व्यवसायाबाबत प्रकल्प अहवाल रु. ३ लाख पर्यंत लाभार्थ्यांच्या स्वाक्षरीने प्रमाणित केलेला चालेल.
- दरपत्रक.
- ज्यांचे हद्दीत व्यवसाय करावयाचा आहे त्यांचे व्यवसाय करण्यास हरकत नसल्याबाबत प्रमाणपत्र (ग्रामीण भागाकरिता ग्रामपंचायत, सरपंच किंवा सचिव, शहरी भागाकरिता महानगर पालिका किंवा गुमास्ता प्रमाणपत्र)
वैधानिक कागदपत्र
नमुना क्र.
१. स्थळपाहणी
२. जमीनदार वैयक्तिक माहिती
३. पैसे दिल्याची पावती
४. डी.पी. नोट
५. प्रतिज्ञा पत्र (लाभार्थींच्या नावे १०० रु. च्या स्टॅम्प पेपरवर)
६. जामीन करारनामा (१०० रु. च्या स्टॅम्प पेपरवर)
७. तारण करार नामा (१०० रु. च्या स्टॅम्प पेपरवर) पशुपालन व्यवसाया करिता नमुना क्र. १,२,३,४,५,७,९
More Stories
Buddhist Bharat: A Vision for Social Equality बुद्धिस्ट भारत : सामाजिक समतेच्या दिशेने एक परिवर्तनकारी दृष्टी
म्यानमारमधील बौद्ध मठावर ध्यानधारणेच्या शिबिरादरम्यान झालेल्या हल्ल्यात १४ जणांचा मृत्यू: अहवाल
‘विकसित भारत २०४७’ साठी बौद्ध मूल्ये आणि आधुनिक विज्ञान महत्त्वाचे: हिमाचलचे राज्यपाल