November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

तु फार लवकर जाण्याची घाई केलीस मित्रा

Manoj Bhai Sansare

Manoj Bhai Sansare

भव्य बौद्ध सांस्कृतीक उत्सव म्हणजे वडाळा पूर्वेला, दहा दिवस बौद्ध विचारवंत, अभ्यासक,ज्ञानी वक्त्यांची अभ्यासपूर्ण भाषणे , शाहीरी कलाकारांची मने चेतवणारी शाहीरी अदाकारी, समाजावर होणारे अन्याय अत्याचार आपल्या कथा-कांदब-यातून मांडणाच्या लेखक कविची समेलने, व फक्त बौद्ध समाज स्थिमित असलेली गायनकला आणि गायन पार्टीचे सामने,पुस्तकांचे प्रदर्शन विशिष्ठ कामगिरी बजावणाऱ्या , समाजातील मान्यवरांचे सत्कार सोहळे, प्रसिध्दीपासून दूर असलेल्या समाजातील – आय. ए. एस , आय.पी.एस, आय. आर. एस किंवा खाजगी क्षेत्रात विषेश कामागिरी बजावणाऱ्यांचे परिचय असे विविध कार्यक्रम, उपक्रम, आखणी असलेला उत्सव म्हणजे समाजातील राजकीय गट तट, प्रांतभेद , लहान मोठा विसरून सर्व समाज दहा दिवस उत्सव साजरा करीत असल्याच्या बातम्यामुळे संपूर्ण मुंबई शहर आणि. मुंबई उपनगरातील जनता, गांव-खेडयात जत्रेला जाणाऱ्या यात्रेकरू सारखी मुला-बाळांसह, वडाळ्याच्या उत्सवात सहभागी होत होती. ते सर्वजण भाई तुला शोधीत असत कारण हया उत्सवाचे आयोजन तू केल्याचे त्यांच्या पर्यंत पोहचलेले असे. मनोज भाई संसारे हे आपल्या समाजातील नगरसेवक आहेत. म्हणून त्याना आनंद होई.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्याने येणा-या आंबेडकर अनुयायी समाजाचे शिवाजीपार्क मैदानात, डाव्या बाजुला लक्ष वेधून घेणारा डॉ. बाबासाहेबांचा मनोवधक पुतळा , सहा फूट उंचीच्या चौथरावर उभा, त्याला जोडून पाहूणेमंडळींना खुर्ची टेबलावर बसून भोजन घेता येईल असा भव्य शामियाना त्यांच्या मध्यभागी आयोजक, कारभारी नगरसेवक भाई संसारे लोकांना अभिवादन करित आहे हे दृश्य फार भव्य वाटे.
आंबेडकर अनुयायी समाजात नगरसेवक म्हणजे फार मोठा नेता समजला जातो. त्यापेक्षा जास्त बौद्ध सांस्कृतिक उत्सव आणि सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने समाजाला सन्मानपूर्वक अन्न देणे या कामामुळे भाईला लोकनेता म्हणून मान्यता मिळाली. भाई समाजात एकमेव नेता ठरला. रिंगटोन प्रकरणात चि.शेजवळ याची हत्या झाली. भाईच्या नेतृत्वात शिर्डी शहर संपूर्ण भयभीत झाले होते. आणि त्या दिवसापासून आंबेडकर अनुयायी समाजात एक आश्वासक नेतृत्व म्हणून समाज भाई कडेपाहू लागला होता. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची त्याची भूमिका होती. राणा हॉटेल चेंबूर, ठाण्याला उपवनात रिसोर्टमध्ये, आंबेडकर भवन दादर येथे आणि शेजवळ यांच्या आई वडिलांसह आझाद मैदान कार्यक्रम या प्रत्येक वेळी मला फोन करून बोलावणे केले.त्या शिवाय संघटना बांधणी विषयी आमच्यात फारचर्चा होई.स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष ह्या नांवाने लोणावळ्याच्या साळवे नावाचा पक्ष नोंद केला आहे. त्यामुळे ते नाव घेता येणार नाही.जबाबदार आणी अभ्यासू कार्यकर्त्यांची फळी आपण उभी करू शकलो नाही. चळवळीतील पारदर्शकता जपली जाणे असे कितीतरी मुद्दे आपण बोलत होतो . चळवळीतील घडामोडीत सयाजी वाघमारे हे नांव फारसे ऐकले नाह‌ी, हा चेहरा कधी दिसला नाही, परंतु भाई संगारेना भेटण्यास येणारा आणि बरोबरीने संवाद करणारा हा माणूस, आणि आपली भेट फार उशिरा झाली ह्याचे वाईट वाटून घेणारा, एक सच्चा मित्र.
भाई तू जाण्याची फार घाई केलीस मित्रा

🙏 तुला भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

✒️ समाज भुषण आद. आयु.सयाजी वाघमारे
📞 98 92 06 69 67, 70 39 48 34 38
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥