July 23, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

“मंगल कर्मे किंवा उत्तम मंगल ही “महा मंगलसुत्त”

🌷 तथागत बुद्धांनी सांगीलेली 38 प्रकारची “मंगल कर्मे किंवा उत्तम मंगल ही “महा मंगलसुत्त” या नावाने ओळखली जातात, ती खालील प्रमाणे… 🌷

1.मुर्खांची संगती करु नये.
2.बुद्धिवंतांची संगती करावी.
3.शीलवंताची संगती करावी.
4.अनुकूल ठिकाणी निवास करावा.
5.कुशल कर्मांचा संचय करावा.
6.कुशल कर्मे करण्यात रत होणेे.
7.अधिकाधीक ज्ञान संचय करणे.
8.तंत्रविद्या ( Work Of Art ) शिकणे
9.व्यवहार कुशल आणि विनंम्र होणे.
10.विवेकशील होणे.
11.सुंदर वक्ता होणे.
12.माता-पिता यांची सेवा करणे.
13.सहचारिणी, पुत्र – पुत्री यांचे पालन पोषण करणे.
14.अकुशल कर्मे न करणे.
15.निरपेक्ष भावनेने ( कोणतीही अपेक्षा न करता ) दान देणे.
16.धम्म पालन-आचरण करणे
17.सगे-संबंधी यांचा आदर सत्कार करणे.
18.कल्याणकारी कार्य करणे.
19.काया-वाचा-मनाने दुस-याला पीड़ा होईल असे कार्य न करणे.
20.नशील्या पदार्थांचे सेवन न करणे.
21.धम्म कार्यात तत्पर रहाणे.
22.गौरवशाली व्यक्तिमत्व बनवणे.
23.विनंम्र स्वभाव बनवणे.
24.पूर्ण रूपाने संतुष्ट अर्थात तृप्त होणे.
25 कायम कृतज्ञभाव ठेवणे.
26.वेळो-वेळी धम्म चर्चा करणे.
27.क्षमाशील होणे.
28.आज्ञाकारी होणे.
29 भिक्खुचें अथवा शीलवंत लोकांचे दर्शन करणे.
30.मनास एकाग्र करणे.
31.मनास निर्मळ करणे.
32.सतत जागरूक अर्थात सजग असणे.
33.पाच शीलांचे पालन करणे.
34.चार आर्यसत्यांचें दर्शन करणे.
35.आर्य अष्टांगिक मार्ग अंगीकारणे.
36.निर्वाणचा साक्षात्कार करणे.
37.लोक धम्म लाभ-हानि,यश-अपयश,सुख-दुख,जय-पराजय या पासून विचलित न होणे.
38.शोक विरहित,निर्मळ आणि निर्भय होणे.

वरिल प्रमाणे 38 मंगल कर्मांचे पालन केल्यास जीवनात येणारी दुःख आणि अडचणी दूर होतील