ज्येष्ठ पौर्णिमेला पाली भाषेत ‘जेठ्ठ मासो’ म्हणतात. ही पौर्णिमा साधारणतः जून महिन्यात येते. भगवान बुद्धाच्या जीवनातील काही महत्त्वपूर्ण घटना याच पौर्णिमेला घडल्यात. उदा. सुजातास धम्मदीक्षा, तिसरी धम्मसंगिती, तपस्सु व भल्लिकाची धम्मदीक्षा, संघमित्रा व महेन्द्र यांचे प्रयाण. भिक्खू महेन्द्राचे निर्वाण. या पौर्णिमेला ज्या घटना घडल्या, त्याचा संक्षिप्तपणे परिचय असा-
१) सुजातास धम्मदीक्षा
जिघच्छा परमा रोगा, सङखार परमा दुखा। एतं ञत्वा यथाभूतं, निब्बानं परमं सुखं ।। (धम्मपदं २०३)
(भूक हा परम रोग आहे. संस्कार हे परम दुःख आहे. हे यथार्थ जाणणाऱ्यास निब्बाण हेच परम सुख आहे.)
भगवान बुद्ध महापरिनिर्वाणापूर्वी आनंदला म्हणाले, “आनंद! माझ्या संपूर्ण जीवनातील दोन भोजनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. एक सुजाता द्वारा दिल्या गेलेली खीर आणि दुसरे चुन्दचे अंतिम भोजन. पहिल्या भोजनामुळे मला सम्यक सम्बोधी प्राप्त झाली; तर दुसऱ्या भोजनामुळे मला महापिरिनिब्बाण प्राप्त होत आहे.” अशा शब्दात भगवान बुद्धांनी सुजाताद्वारा अर्पण केलेल्या खिरीचे महत्त्व वर्णन केले आहे. त्यामुळे बौद्ध इतिहासात सुजाताला व तिने दान केलेल्या खिरीलाही अनन्यसाधारण महत्त्व आहे.
ज्ञानप्राप्तीसाठी गौतमाने सुरू केलेली तपश्चर्या आणि त्याचे आत्मक्लेश यांचे स्वरूप अत्यंत भीषण होते. अशा प्रकारची त्याची तपश्चर्या आणि त्याचे आत्मक्लेश सहा वर्षांपर्यंत चालले होते. सहा वर्षांनंतर त्याचे शरीर इतके क्षीण झाले होते की त्याला हालचालही करता येत नव्हती. तरीही त्याला नवीन प्रकाश दिसला नव्हता. ज्या प्रश्नावर त्याचे मन केंद्रित झाले होते, त्या ऐहिक दुःखाविषयीच्या प्रश्नाचा त्याला यत्किंचितही उलगडा झाला नव्हता.
तेव्हा गौतम स्वतःशीच विचार करू लागला, हा मार्ग वासनामुक्त होण्याचा किंवा पूर्ण ज्ञानाचा अथवा मुक्तीचा नाही. तेव्हा त्याला प्रश्न पडला की, शारीरिक क्लेशांना धर्म म्हणता येईल काय?
ज्याची शक्ती नष्ट झाली आहे. भूक, तहान, आणि थकवा यांनी जो गळून गेला आहे, थकल्यामुळे ज्यांचे मन शांत राहिलेले नाही, त्याला नवा प्रकाश प्राप्त होऊ शकत नाही,
जे ध्येय मनाच्या सहाय्याने गाठावयाचे आहे, ते ज्याला संपूर्ण शांतता लाभलेली नाही, तो ते कसे गाठू शकेल? खरी शांती आणि एकाग्रता शारीरिक गरजांच्या अखंड तृप्तीनेच योग्य प्रकारे लाभते.
हा गौतमाचा विचार सुरू असताना सुजाता आली आणि स्वतः शिजवलेले अन्न तिने एका सोन्याच्या पात्रात गौतमाला वाढले.
ते पात्र घेऊन तो नदीकाठी गेला. सुप्पतिष्ठ्ठ नावाच्या घाटावर त्यांनी आंघोळ केली आणि मग ते अन्न ग्रहण केले. उपासतापास, व्रतवैकल्ये व क्लेशाने शरीर क्षीण करून सत्य सापडत नाही, अशी त्याची खात्री झाली. नव्याने दुःख निवारण आणि सत्य साक्षात्काराच्या शोधार्थ त्यांनी प्रयास केला.
पुढे बुद्धगया येथे ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर त्यांना सुजाताला दिलेल्या वचनाची आठवण झाली. त्या वचनपूर्तीसाठी त्यांनी सुजाताचा शोध घेतला. सुजाताच्या
घरी प्रत्यक्ष जाऊन सुजाता, तिचा पती व तिचा पुत्र यश यास सद्धम्माची दीक्षा दिली. सुजाताचे हे वाराणसीत एकमेव कुटुंब असे होते की ज्यांनी सर्वप्रथम सहपरिवार ‘दीक्षा’ ग्रहण केली. सुजाताविषयी तथागत बुद्ध म्हणाले की, “भिक्खूंनो! माझ्या उपासिकांमध्ये प्रथम येणाऱ्यांमध्ये सेनानी पुत्री सुजाता सर्वश्रेष्ठ आहे.” सहपरिवार सुजातास दिलेला दीक्षेचा दिवस होता ज्येष्ठ पौर्णिमेचा।
२) तपुस्स आणि भल्लिकाची धम्मदीक्षा धम्मं चरे सुचरितं, न तं दुच्चरितं चरे। धम्मचारी सुखं सेति, अस्म्हि लोके परम्हि च।। (धम्मपदं : १६९)
(सुचरित धम्माचे आचरण करावे, दुश्चरित कर्म करू नये. धम्मचारी इहलोकी आणि परलोकी सुखाने राहतो.)
भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर ते एक महिना बोधिवृक्षाखाली पाहिले. नंतर पाचव्या आठवड्यात ते निग्रोध वटवृक्षाखाली गेले. एक आठवड्याच्या तेथील वास्तव्यानंतर त्यांनी मुचलिंद नावाच्या पर्वताकडे प्रस्थान केले. तेथील राजायतन वृक्षाखाली ते एक सप्ताह थांबले. पुढील आठवड्याच्या शेवटच्या दिवशी त्यांच्याकडे तपुस्स आणि भल्लिक हे दोन बंधू येताना दिसले.
ते दोन बंधू व्यापारी होते. ते पाच गाड्यावर माल लादून त्या रस्त्याने जात होते. ते उत्कलहून (ओरिसा) मध्यदेशाकडे व्यापारासाठी निघाले होते.
भगवान बुद्ध दिसताच त्या दोन्ही व्यापारी बंधूनी त्यांना वंदन केले. भगवंताला त्यांनी मध व पोळ्या दिल्या. या खाद्य पदार्थाचा स्वीकार करावा, अशी विनंती केली. भगवंतांनी त्यांची भेट स्वीकारली. आपण अर्पण केलेल्या वस्तूंचा भगवंतांनी स्वीकार केला, हे पाहून त्यांनी वंदन केले. ते भगवंताचे उपासक झाले. त्यावेळी संघाची स्थापना झाली नव्हती. म्हणून ‘भगवंताला शरण जातो, धम्माला शरण जातो’ या दोन वचनांनीच ते शरण गेले. यास्तव त्यांना ‘द्विवाचिक’ उपासक म्हणतात. असा उल्लेख महावग्गाच्या आरंभी सापडतो.
आम्ही आपले अनुयायी आहोत, या नात्याने आपल्या धम्माचे सर्व नियम आम्ही अंतःकरणपूर्वक पाळू याकरिता आपण आम्हास सद्धम्माची दीक्षा द्यावी, अशी नम्र विनंती त्या व्यापारी बंधूनी भगवंताला केली. त्यानुसार भगवंतांनी त्यांना ‘उपासक’ या नावाने संबोधले. त्यांना धम्मात प्रवेश दिला. त्या काळात भगवान बुद्धाचा संघ अस्तित्वात नव्हता.
भगवान बुद्धाच्या उपासनेचे काही चिन्ह आपणाजवळ असावे, अशी त्या व्यापारी बंधूनी उत्कट इच्छा व्यक्त केली. त्यानुसार भगवान बुद्धांनी त्यांचे आठ केस ‘जटा स्मृतिचिन्ह’ म्हणून दिले. व्यापारी बंधूनी त्या केसांना श्रद्धापूर्वक स्वीकारले. तेच भगवंताचे ‘स्मृतिचिन्ह’ समजून स्वदेशी गेल्यावर त्यावर मोठा चैत्य बांधला. त्यातून उपोसथाच्या दिवशी नीलरश्मि निघत असत, अशी दंतकथा मनोरथपूरणीत आली आहे.”
यापैकी एक केस अशोकाच्या वेळी मोग्गलिपुत्ततिस्स महास्थविराने सुवर्णभूमीला पाठविले. सोण आणि उत्तर या दोन स्थविरांनी ब्रह्मदेशाला नेले, व त्याच्यावरच रंगूनला असलेला अत्यंत भव्य सुवर्णचैत्य (स्वे-दगून फया) उभारला आहे, अशी ब्रह्मी लोकांची समजूत आहे.”
या दोन व्यापारी बंधूना भगवान बुद्धाने ‘उपासक’ म्हणून दीक्षित केले आणि त्यांना स्मृतीप्रीत्यर्थ आठ केस दिले, तो दिवस होता ज्येष्ठ पौर्णिमेचा !
३) संघमित्रा व महेंद्र यांचे प्रयाण
पियतो जायती सोको, पियती जायती भयं।
पियतो विप्पमुत्तम, नत्थि सोको कुतो भयं ।। (धम्मपदं : २१२)
(प्रियापासून शोक उत्पन्न होतो. प्रियापासून भय. प्रियापासून जो मुक्त आहे, त्याला शोक नाही तर भय कोठून?)”
सम्राट अशोकाने त्यांचे धम्मगुरू महास्थविर मोग्गलीपुत्त तिस्स यांना एकदा विचारले होते, “भन्ते, बौद्ध धम्मात सर्वात अधिक त्याग कोणाचा?”
त्यावर भन्ते म्हणाले, “राजन, भगवंतांच्या जीवनकाळात आणि त्यांच्यानंतर तीनशे वर्षात तुझ्यासारखा त्यागी कोणीही झाला नाही.”
तेव्हा सम्राट अशोक म्हणाले, “भन्ते, माझ्यासारख्या दानी उपासकास, धम्माचा उत्तराधिकारी किंवा धम्माचा दायाद म्हणता येईल काय?”
त्यावर महास्थविर मोग्गलीपुत्त तिस्स म्हणाले, “राजाधिराज, तुझ्यासारखा महात्यागी सम्राटास धम्माचा दायाद म्हणता येणार नाही, फार तर अशा त्यागी व्यक्तीस धम्माचा दाता (दायक) म्हणता येईल.”
तेव्हा सम्राट अशोकाने धम्मगुरू तिस्सास पृच्छा केली, “भन्ते, मला धम्माचा दायाद बनण्यासाठी आणखी काय करावे लागेल?”
तेव्हा भन्ते म्हणाले, “जो कोणी आपला स्वतःचा मुलगा वा मूलगी धरना प्रब्रजित करून भिक्खू ‘दायक’ आणि ‘दायाद’ या दोन्ही उपाधींसाठी पात्र ठरतो.”
धम्माचा ‘दायाद’ बनण्यासाठी महाराज अशोकाने आपला पुत्र महेंद्र आणि पुत्री संघमित्रा यांना जवळ बोलावून विचारले, “तात, काय आपण दोघेही प्रव्रज्या ग्रहण कराल?”
दोन्ही मुलांनी उत्तर दिले, “देव, जर आपली इच्छा असेल तर आपी आजच प्रव्रजित होऊ. प्रव्रज्या ग्रहण करण्याने आमचे व आपलेही असे आम्हाला वाटते.” कल्याण होईल.
त्यानुसार सम्राट अशोकाचे अपत्य पुत्र महेंद्र आणि कन्या संघमित्रा या दोघांनी आपल्या पित्याच्या इच्छेखातर गृहस्थ जीवनाचा त्याग करून प्रव्रज्या घेतली. त्यावेळी महेंद्राचे वय अवघे २० वर्षांचे तर संघमित्राचे वय अवघे १८ वर्षांचे होते.”
जेव्हा महानाम महेंद्रास प्रव्रजित होऊन १२ वर्षांचा कालावधी पूर्ण झाला तेव्हा धम्मगुरू मोग्गलीपुत्त तिस्स आणि संघाने त्यांना मनोरम लंकाद्वीपामध्ये जाऊन बौद्ध धम्माच्या स्थापनेची आज्ञा केली. धम्मगुरूची आज्ञा शिरसावंद्य मानून स्थविर महेंद्राने उपाध्याय व संघास वंदन केले. सोबत चार स्थविरांना सोबत घेऊन बौद्ध धम्माच्या प्रचार व प्रसारासाठी लंकाद्वीप गाठले. तो दिवस ज्येष्ठ पौर्णिमेचा होता. इ.स.पू. २५२ या वर्षी.
तसेच काही काळानंतर भिक्खुणी संघमित्रा यांनाही बोधिवृक्षाच्या फांदीसह महामति महेन्द्रांनी श्रीलंकेस बोलावून घेतले. संघमित्रा अनेक श्रामणेरींना सोबत घेऊन लंकेत दाखल झाली. श्रीलंकेचा महाराजा देवनामप्रिय तिस्स आणि त्यांची महाराणी अनुला यांच्या व महेन्द्राच्या निमंत्रणावरून संघमित्रा बोधिवृक्षाची एक शाखा घेऊन श्रीलंकेमध्ये दाखल झाली. तेथे भिक्खुणी संघाच्या शाखेची स्थापना केली. नंतर हळूहळू संघमित्राने महाराणी व तिच्या सोबतच्या अनेक कुलीन स्त्रियांना तसेच ५०० कुमारिकांना भिक्खुणी संघात प्रविष्ट केले.
भिक्खुणी संघमित्रा यांनी भारतातून आणलेली बोधिवृक्षाची एक शाखा श्रीलंकेच्या अनुराधापुरम् येथे लावली. तो दिवस होता, ज्येष्ठ पौर्णिमेचा !
4) भिक्खू महेंद्राचे निर्वाण
वीतातान्हो अनादनो, निरुतिपदकोविदो। अक्षरण सन्निपतम, जा पब्बापारणी सीए. जतन करा “अंतिमसारिरो, महापन्नो ती महापुरीसो” ती वुच्चाटी. (धम्मपदम. 352) (जो तृष्णारहित आहे, जो परग्रहरहित आहे, जो भाष्य आणि काव्य जाणतो, जो व्याकरण जाणतो, ज्याला निश्चित परम शरीर आहे, त्याला ‘महाप्रज्ञा’ म्हणतात.)
सम्राट अशोकाचा मुलगा महेंद्र याचा जन्म मध्य प्रदेशातील विदिशा येथे इसवी सनपूर्व १००० मध्ये झाला. 285 चा जन्म झाला. सम्राट अशोकाचा मुलगा अशोक ‘दयद’ ही पदवी मिळविण्यासाठी स्वतः वनवासात जाण्यास तयार झाला. त्याने स्थलांतर केले तेव्हा तो 20 वर्षांचा होता.
१२ वर्षांचा वनवास संपवून जेष्ठ पौर्णिमेच्या दिवशी धम्मगुरु मोग्गलीपुत्त तिसा आणि संघ यांच्या आदेशानुसार ते लंकाद्वीपाला पोहोचले.
आजही श्रीलंकेत महामहेंद्राच्या आगमनाचा दिवस साजरा केला जातो. महामहेंद्र यांच्या कार्यातूनच श्रीलंकेत संपूर्ण बुद्धाचे प्रथम लिप्यंतरण झाले, तसेच पाली अथागाथांची रचना आणि जतन करण्यात आली.
जर महामहेंद्र आणि भिक्खुनी संघमित्र श्रीलंकेला धम्मदूत म्हणून गेले नसते, धम्म संदेशाचा प्रसार केला नसता, संपूर्ण बुद्धवचन (त्रिपिटक) तसेच अथकथा (भाष्य) रचली नसती आणि धम्मसंगीत भरली नसती, तर कदाचित जगाने त्रिपिटक पाहिले नसते. आज
चौदाव्या शतकात बौद्ध धर्माच्या विरोधकांनी आणि कट्टर आक्रमकांनी बौद्ध साहित्य भारतातून नष्ट केले होते. अशा परिस्थितीत महामहेंद्र यांनी श्रीलंकेतील साहित्य जपले. श्रीलंकेतील अडतीस वर्षांच्या धम्मसेवेनंतर वयाच्या ८० व्या वर्षी महामहेंद्र यांचे निधन झाले.” त्यांचे निर्वाण 205 ईसापूर्व ज्येष्ठ पौर्णिमेला श्रीलंकेतील अनुराधापुरम येथे झाले.
या संदर्भात तपुस्सा आणि भल्लिका यांच्या धम्मदीक्षा, सुजाता यांची धम्मदीक्षा आणि महामहेंद्र आणि संघमित्र यांच्या कार्याने ज्येष्ठ पौर्णिमा अधिक पवित्र झाली आहे.
More Stories
अश्विन पौर्णिमा – अस्सयुज मासो Ashwin Purnima
भाद्रपद पौर्णिमा – पोट्ठपाद मासो Bhadrapada Poornima – Potthapada Maso
आषाढ पौर्णिमा Ashadha Purnima