November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

बौध्दांनी आपल्या सामाजिक भांडवलाचा विचार केला पाहिजे !

सहकार्य करण्याची मनुष्य प्राण्यात अंगभूत गुण वृत्ती असते . तरी देखील समाजात वावरतांना त्या गुणांचा अनुभव येतोच असे नाही . सहकार्य करतांना माणसात संस्कारीत वृत्ती , भावनांच प्रभुत्व यामुळे वेगळेच फाटे फुटतात . जसे आपल्या जातीचा नाही , आपल्या धर्माचा नाही , म्हणून सहकार्य नाकारले जाते . एखाद्या समुहात वावरताना सहकार्याचा अनुभव येईल की फसवणुकीचा हे त्या समूहाचं सामाजिक भांडवल किती यावर अवलंबून असत . सामाजिक भांडवल हे समूहातल्या सर्वांचा परस्परविश्वास , विश्वासाची परतफेड होण्याची शाश्वतता यातून उभं राहतं . जितका विश्वास जास्त, तितकं सहकार्य जास्त . थोडक्यात जगण्याच्या खेळात सर्वांना फेअर प्ले चा अनुभव येत असेल तर सामाजिक भांडवल चांगल असणार .

सर्वसाधारणपणे व्यवहार करताना अनोळखी माणसाकडून वस्तू खरेदी करायची आहे . तर बिनधास्त अँडव्हान्स देतांना मन कचरत असते , दिला असेल तर वस्तू मिळेपर्यंत मनात धाकधूक असते . विशेषतः तो दुसऱ्या जाती धर्माचा असेल तर धाकधूक जास्त असते . ज्या समाजात आपण वाढतो तिथल्या संस्कृतीत ‘ सहकार्य फसवणूक ‘ याचे काय संस्कार होतात , ‘ समाजिक भांडवल ‘ कस आहे यावर बरंच काही अवलंबून आहे , अमुर्त अशा या समाजिक भांडवलाचे परिणाम खूपच मूर्त आणि वास्तव आहेत .

भौतिक गरजा , दर्जेदार राहणीमान यासाठी फक्त आर्थिक भांडवल लागतं , हा मोठा गैरसमज आपण करून घेतलेला आहे . उलट , सामाजिक भांडवल कळीची भूमिका निभावत. एकमेकांच्या विश्वास व सहकार्यातून तयार होणार ‘ गुडविल ‘ असेल तिथे व्यवहार विश्वासावर होऊ शकतात . आर्थिक देणे घेणे शहाणपणानं होवून सर्व समाजाच राहणीमान उंचावत समाजात वावरतांना सुरक्षित वाटत . वैयक्तिक मनःस्वास्थ चांगल राहतं .

व्यक्ती केंद्रित जगत असलेल्या बौध्द माणसाला समाज म्हणजे काय , हेच अद्याप समजलेले नाही . प्रत्येक बौध्द माणूस हा संस्कृती नसलेल्या गरिब आई बापाचा वारसदार आहे . नोकरी-धंदा मिळाल्यामुळे त्याच्या भौतिक गरजा भागविल्या गेल्या आहेत. राहणीमानात बदल झाला आहे . परंतू समाज आणि समाजात राहणे हे त्याला समजले नाही . त्यासाठी एकापेक्षा जास्त संख्येने बौध्द बांधवांनी एकत्र आले पाहिजे . समाजाचे प्रश्न , ज्यामध्ये आपला देखील प्रश्न आहे . त्याचे भान समूहामध्येच येते .

मुंबई महानगरपालिकेच्या सफाई खात्यात अनुकंपा तत्वावर मागासवर्गीयांची तरूण मुले , मोठ्या संख्येने भरती होताना दिसतात . निकृष्ट जीवन पध्दतीमुळे लवकर मरणे आणि त्याची जागा मुलाने घेणे ह्या जगण्याच्या रहाटगाडग्याकडे समाज म्हणून कुणाचेही लक्ष नाही .आपल्या मुलांनी इतक किळसवाणं काम करत राहावं असं त्यांना का वाटत असेल ? याचे उत्तर त्यांच्या अगतिकतेत आहे . जे मिळालं आहे तेही मिळालं नाही तर ? खाजगीकरणामुळे येणाऱ्या अटीतटीच्या जगण्याच्या लढाईतून वाचण्यासाठी प्रगतीचा मार्ग समाज व्यवस्था मिळू देणार नाही . शिक्षण परवडणार नाही शिकले तरी बाहेर उच्चवर्णीयांशी स्पर्धेत टिकणार नाही ही साधार भिती भेडसावत आहे .

बौद्ध समाजात डॉक्टर , प्राध्यापक , वकिल , इंजिनिअर , पोलीस अधिकारी , शासकीय अधिका – यांची संख्या किती आहे . खाजगी उद्योगात उच्च पदावर , शेअरमार्केटच्या व्यवसायात , छोटे व्यवसाय करणारे , छोटे उद्योजक , उत्पादक यांची संख्या , त्यांचे प्रश्न अभ्यासले गेले पाहिजेत .

शिक्षण संस्था , सहकारी संस्था , शेतीकरणे , शेती उद्योगात शिरकाव करून घेतला पाहिजे , राखीव जागेवर मिळणाऱ्या नोकऱ्यांचे स्वप्न बौध्द समाजाने सोडून दिले पाहिजे . राखीव जागेसाठी निघणाऱ्या लाखोंच्या मोर्चाला आपल्या शुभेच्छा असल्या पाहिजेत .

 

समाज भुषण आद. आयु.सयाजी वाघमारे
📞 98 92 06 69 67     70 39 48 34 38
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

संकलन

विलास पवार , रायगड
📞 91 37 66 2424