February 5, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

डॉ.बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रा संदर्भात चाळीसगाव येथे मीटिंग संपन्न.

दि. 29/1/2025,बुधवार रोजी चाळीसगांव येथे शासकीय विश्राम गृह येथे सर्व बौद्ध बांधवांची बैठक घेण्यात आली ,बैठकीचा विषय असा की 7 फेब्रुवारी 2025 रोजी मुंबई येथून सुरू होणारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रा ही 12 फेब्रुवारी 2025 ला चाळिसगाव शहरात पोहोचणार आहे ,

डॉ.बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रा ही 12 फेब्रुवारी 2025 ला चाळिसगाव शहरात त्या यात्रेचे आणि बाबासाहेबांच्या अस्थी असलेल्या अस्थिकलश ज्या रथावर आहे त्या रथाचे स्वागत ,गावात त्याची मिरवणूक काढणे ,रात्री थांबण्याची सोय करणे ,सोबत आलेले कार्यकर्ते आणि भंतेजींची राहण्याची ,खाण्याची सोय करणे आणि दुसऱ्या दिवशी त्यांची रथाची सजावट करणे आणि पुढच्या प्रवासासाठी तयार करणे असा सर्व विषयांवर चर्चा झाल्या ,त्या साठी 21 लोकांची समिती लागलीच निवडण्यात आली .लागलीच येणाऱ्या खर्चा साठी समाजातील सर्व मान्यवरांनी आणि लोकांनी देणगी जाहीर केली.
सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने मीटिंग ला उपस्थिती दर्शविली .