आषाढ पौर्णिमेला पाली भाषेत ‘आसाळह मासो’ म्हणतात. ही पौर्णिमा साधारणतः जुलै महिन्यात येते. भगवान बुद्धाच्या जीवनातील काही महत्त्वपूर्ण घटना याच पौर्णिमेला घडल्यात. उदा. महामायेच्या उदरात प्रवेश, सिद्धार्थाचा गृहत्याग, धम्मचक्र प्रवर्तन आणि पहिल्या पाच शिष्यांचा वर्षावास. या पौर्णिमेला ज्या घटना घडल्या, त्याचा संक्षिप्तपणे परिचय असा-
१) महामायेच्या उदरात प्रवेश
सुखो बुद्धानं उप्पादो, सुखा सद्धम्मदेसना। सुखा संघस्स सामग्गी, समग्गानं तपो सुखो ।। (धम्मपदं : १९४)
(बुद्धाचा जन्म सुखदायक असतो. सद्धम्माचा उपदेश सुखदायक असतो. संघामध्ये एकता असणे सुखदायक असते आणि सर्व मिळून तप करणे सुखदायक असते.)
शाक्य लोकात प्रतिवर्षी आषाढ महिन्यात येणारा एक उत्सव पाळण्याची प्रथा होती. एकदा महामायेने हा उत्सव मोठ्या थाटामाटात, पुष्पमाला, सुगंधादि वस्नुको उपयोग करून परंतु मद्यपानादि उत्तेजक वस्तू वर्ज्य करून साजरा करण्याचे ठरविले उत्सवाच्या सातव्या दिवशी ती भल्या पहाटे उठली. सुगंधी पाण्याने तिचे स्नान केले. दानधर्मार्थ चार लक्ष मोहरा देणगी म्हणून बाटल्या. मौल्यवान अलंकार घालून साजशृंगार केला. आवडीच्या पदार्थाचे सेवन केले. व्रताचरण करून निद्रेसाठी कलात्मकतेने सजवलेल्या शयनमंदिरात ती गेली.
त्या रात्री शुद्धोदन व महामाया यांचा एकांत होऊन महामायेला गर्भसंभव झाला. पलंगावर पहुडली असताना ती तशीच झोपी गेली. निद्राधीन असताना तिला स्वप्न पडले.
स्वप्नात तिला असे दिसले की चतुर्दिक्पालांनी आपणाला निद्रिस्त स्थितीत मंचकासह उचलले व हिमालयाच्या माथ्यावर नेऊन एका विशाल शालवृक्षाखाली ठेवले. आणि ते त्याच्या बाजूला उभे राहिले. चतुर्दिक्पालांच्या भार्यांनी मानसरोवरात तिला अभ्यंगस्नान घालून तिची वेषभूषा केली. त्यांनी तिला सुगंधी द्रव्ये लावून फुलांनी असे सजविले की, ती कुणा दिव्यशक्तीचे स्वागत करावयास तयार झाली आहे असे वाटले.
इतक्यात सुमेध नावाचा बोधिसत्त्व तिच्यापुढे प्रकट झाला. तो म्हणाला, “मी माझा शेवटचा जन्म पृथ्वीवर घेण्याचे ठरविले आहे. तू माझी माता होण्यास कबूल होशील का?” तीन उत्तर दिले, “मोठ्या आनंदाने.” त्याच क्षणी महामायेला जाग आली.
दुसरे दिवशी सकाळी महामायेने आपले स्वप्न शुद्धोदनास सांगितले. स्वप्नाचा अर्थबोध न झाल्यामुळे शुद्धोदनाने स्वप्नविद्येत पारंगत असलेल्या सुप्रसिद्ध आठ ब्राह्मणांना बोलावून घेतले.
शुद्धोदनाने त्या आठ ब्राह्मणांच्या स्वागताची जय्यत तयारी केली. त्याने सेवकांकडून जमिनीवर फुलांचे सडे घालून त्या ब्राह्मणांसाठी उच्च आसनं मांडली. त्याने त्या ब्राह्मणांची पात्रे सोन्याचांदीने भरून घृतमधुयुक्त व साखरमिश्रित दूध भाताचे सुग्रास भोजन देऊन त्यास संतुष्ट केले. याशिवाय त्यांना नवी वस्त्रे, गायी इ. चे दान दिले.
ब्राह्मण संतुष्ट झाल्यावर शुद्धोदनाने महामायेला पडलेले स्वप्न त्यांना सांगितले आणि तो म्हणाला, “या स्वप्नाचा अर्थ मला सांगा!”
ब्राह्मण म्हणाले, “राजा, चिंता करू नकोस, तुला असा एक पुत्र होईल की जर तो संसारात राहिला तर तो सार्वभौम सम्राट होईल पण संसारत्याग करून जर तो संन्यासी झाला तर तो विश्वातील अज्ञान अंध:कार नाहीसा करणारा भगवान बुद्ध होईल!”
हा स्वप्नाचा अर्थ ऐकून शुद्धोदनाची अवस्था द्विधा झाली. परंतु हा अर्थ लक्षात घेऊन महामायेने पात्रातील तेलाप्रमाणे दहा महिने बोधिसत्त्वाला आपल्या गर्भात धारण केले. तो दिवस आषाढ पौर्णिमेचा इ.स.पूर्व ५६४ चा होता.
२) सिद्धार्थाचा गृहत्याग
उय्युञ्जन्ति सतीमन्तो, न निकेते रमन्ति ते।
हंसाव पल्ललं हित्वा, ओकमोकं जहन्ति ते ।। (धम्मपदं : ९१) (स्मृतिमान व्यक्ती (समाधीत) मग्न असतात; घरात रमत नाहीत. ज्याप्रमाणे हंस क्षुद्र जलाशय सोडून जातात, त्याप्रमाणे ते घर सोडून निघून जातात.)*
सिद्धार्थ गौतमाने अखेर गृहत्याग करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मातापित्याची समजूत घातली. पित्याला समजावताना सिद्धार्थ म्हणाला, “मी परिव्रज्या घेण्याचे वचन दिल्यामुळेच तर संघाने कोलीयांच्या विरुद्ध युद्ध करण्याचे स्थगित केले आहे.” पुढे सिद्धार्थ म्हणाला, “मी वचन दिले आहे, मी ते पूर्ण केलेच पाहिजे. वचनभंगाचे परिणाम आपणाला व शांततेच्या पक्षाला, दोघांनाही भयंकर ठरतील.”
आईची समजूत घालताना सिद्धार्थ गौतम म्हणाला, “आई, आता माझ्या मार्गात आड येऊ नकोस, मला आज्ञा दे आणि आशीर्वाद दे. जे घडत आहे ते चांगल्यासाठीच घडत आहे.”
परंतु यशोधराने तर सिद्धार्थाचीच समजूत घातली. “आपला निर्णय योग्य आहे. माझी आपणाला अनुमती आहे आणि पाठिंबाही आहे.”
या सर्वांचा आशीर्वाद व पाठिंबा घेऊन सिद्धाथनि गृहत्याग केला. गृहत्याग करून तो जसजसा आश्रमाच्या जवळ आला तसतसे त्याला पाहण्यासाठी स्त्री- पुरुषांनी प्रचंड गर्दी केली. मोठ्या प्रयासाने त्या गर्दीतून त्याने स्वतःची सुटका करून घेतली आणि आश्रमाच्या दारात प्रवेश केला.
आश्रमाच्या आवारात प्रवेश करताच तेथे जमलेल्या लोकात आपले मातापिता असलेले त्याला दिसले. त्यांचा आशीर्वाद मागितला. त्यावेळी त्यांच्या
भावना इतक्या दाटून आल्या होत्या की त्यांच्या मुखातून एकही शब्द बाहेर पत
ताज्या कष्टाने सिद्धार्थ आपल्या मातापित्यापासून दूर झाला. त्याने आपले नव्हता. कपडे व अलंकार घरी परत नेण्यासाठी छन्नाला दिले. त्याने परिव्राजकाला आवश्यक असे आपले मंडन करून घेतले. त्याचा चुलतभाऊ महानाम याने परिव्राजकाला योग्य अशी वस्त्रे व भिक्षापात्र आणले होते. सिद्धाथनि ते वस्त्र परिधान केले.
भारद्वाजाने आपल्या शिष्यांच्या साहाय्याने आवश्यक तो संस्कार विधी केला. आणि सिद्धार्थ गौतम परिव्राजक झाल्याचे जाहीर केले. परिव्रज्येचा संस्कार आटोपल्यानंतर लगेच सिद्धार्थ आपल्या प्रवासाला निघाला.
राजपुत्र सिद्धार्थ आश्रमाच्या बाहेर पडताच जनसमुदायही त्याच्या मागोमाग जाऊ लागला. तो थांबला आणि जनसमुदायास परत जाण्यास सांगितले. शुद्धोदन व गौतमी राजवाड्याकडे परतले. सिद्धार्थाने टाकून दिलेली वस्त्रे व आभुषणे बघणे गौतमीला असह्य झाले. तिने ती वस्त्रे व आभुषणे कमळांनी भरलेल्या एका तळ्यात टाकली.
परिव्रज्या ग्रहण करण्याच्यावेळी सिद्धार्थ गौतमाचे वय अवघे एकोणतीस वर्षांचे होते. त्यांचा हा त्याग शौर्याचे आणि धैर्याचे कृत्य आहे, ज्याला जगाच्या इतिहासात तोड नाही. म्हणून त्याला शाक्यमुनी अथवा शाक्यसिंह म्हणतात. शाक्यकुमारी गौतमीचे म्हणणे आहे, “धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, ज्यांनी अशा पुत्राला जन्म दिला. धन्य ती पत्नी जिला असा पती लाभला.”*
सिद्धार्थ गौतमाच्या गृहत्यागाच्या घटनेला गौतमाचे ‘महाभिनिष्क्रमण’ म्हणतात. ती घटना आषाढ पौर्णिमा इ.स.पू. ५३४ ची आहे. विश्वातील सर्व बौद्ध बांधव ‘सिद्धार्थाचा गृहत्याग’ म्हणून साजरा करतात.
३) धम्मचक्र प्रवर्तन
सब्ब पापस्स अकरणं, कुसलस्स उपसम्पदा । सचित्त परियोदपनं, एतं बुद्धान सासनं ।। (धम्मपदं : १८३)
(कोणतेही पाप न करणे, शुभ कर्म करणे, चित्ताला परिशुद्ध ठेवणे, हीच बुद्धाची शिकवण आहे.)”
सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केल्यानंतर विविध मार्गाने ज्ञानप्राप्ती केली. आपल्या धम्ममार्गाची रूपरेषा निश्चित केली. तेव्हा भगवान बुद्धाच्या मनात एक प्रश्न उभा
राहिला. दुस-यांना धर्मोपदेश करावा की स्वतःची व्यक्तिगत पूर्णावस्था प्राप्त करून घेण्यासाठी आपले जीवन व्यतीत करावे?
ते स्वतःशीच म्हणाले, ‘नव्या तत्वज्ञानाचा मला लाभ झाला आहे हे खरे; परंतु सामान्य माणसाला ते तत्व मान्य करणे आणि त्याचे अनुकरण करणे अत्यंत कठीण आहे. बुद्धिमान लोकांना देखील हे सहजासहजी कळणार नाही.
अशा अवस्थेत ब्रह्मसहम्पती (त्याच्या मनाची अवस्था) भगवान बुद्धाचे मन वळवतो. भगवान बुद्धाने आपला उपदेश जनतेला देण्यासाठी प्रवृत्त करतो. ब्रह्मसहम्पती अतिशय आनंदाने सुवार्ता जाहीर करतो-
“धन्य आहेत भगवान बुद्ध की त्याचा मार्ग बुद्धिवादी आहे आणि तो धार्मिक भोळसटपणातून मुक्तता करणारा मार्ग आहे, मध्यम मार्गाचा उपदेश करणारा आहे, सद्धम्म शिकविणारा आहे, शांती देणारा, निब्बाण शिकविणारा आहे, मैत्री, करुणा आणि भातृभावाची शिकवण देणारा आहे, आपल्या बांधवांची बंधमुक्तता करणारा आहे. “”
आपल्या या धम्माचा उपदेश करण्याचे ठरविल्यानंतर बुद्धाने स्वतःलाच विचारले की, ‘सर्वप्रथम मी धम्मोपदेश कुणाला देऊ?’
हा धम्मोपदेश आलारकालाम आणि रामपुत्ताला देण्याचा प्रथम विचार
केला. परंतु ते दोघेही मृत्यू पावल्याचे त्याला कळले. नंतर निरंजना नदीच्या काठी
जी तपश्चर्या केली त्यावेळी जे पाच सोबती होते, त्यांची आठवण आली. सारनाथच्या इसिपतनच्या मृगदाय वनात ते पाच सोबती राहात असल्याचे
कळले. तेव्हा ते त्यांच्या शोधार्थ निघाले.
त्या पाच परिव्राजकांनी बुद्ध येत असल्याचे पाहिले. तेव्हा त्याचे स्वागत करावयाचे नाही असे त्यांनी ठरविले. परंतु बुद्ध त्यांच्याजवळ जातात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा इतका प्रभाव पडला की त्यांनी त्यांचे असाधारण स्वागत केले. परस्पराला अभिवादन करून कुशलक्षेम विचारल्यावर त्या परिव्राजकांनी भगवान बुद्धाला विचारले,
“आपणाला आम्ही सोडून गेल्यानंतर आपण काय केले?”
तेव्हा आपण बुद्ध गयेला कसे गेलो, पिंपळाच्या झाडाखाली आपण चिंतन करीत कसे बसलो आणि चार आठवडे सतत चिंतन केल्यानंतर आपणास ज्ञानप्राप्ती झाल्यामुळे आपण नवा मार्ग कसा शोधून काढला, हे सर्व भगवान बुद्धांनी त्यांना सांगितले.
झाले. हे ऐकल्यावर नवा मार्ग कोणता, हे जाणून घेण्यास ते परिव्राजक अधीर
भगवान बद्धाने सांगितले की, दःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे, हाच भगवान बुद्धाच्या धम्माचा पाया होय.
ते पुढे म्हणाले, या धम्मानुसार जर प्रत्येकाने १) पावित्र्याचा मार्ग अनुसरला अर्थात पंचशीलाचे पालन केले, २) सदाचाराचा मार्ग स्वीकारला अर्थात आर्थ अष्टांगिक मार्गाचे पालन केले आणि, ३) शील मार्गाचा अवलंब केला अर्थात दहा पारमितांचे पालन केले तर या दुःखाचा निरोध होईल.
भगवान बुद्धाने हा नवा मार्ग सविस्तर समजावून सांगितला. बुद्धाच्या नव्या धम्माचे प्रवचन ऐकल्यानंतर ते पाच परिव्राजक बुद्धाला ताबडतोब शरण गेले. आणि आपले शिष्य म्हणून आपला स्वीकार करावा, अशी त्यांनी विनंती केली. “एहि भिक्खवे” (भिक्खूंनो, या) असे म्हणून भगवान बुद्धाने त्यांना आपल्या
धम्मात प्रविष्ट करून घेतले. पुढे ते पंचवर्गीय भिक्खू म्हणून प्रसिद्धीस आले.
या पंचवर्गीय भिक्खूंना दिलेले प्रवचन यालाच ‘धम्मचक्र प्रवर्तन’ असे म्हणतात. हे धम्मचक्र प्रवर्तन आषाढ पौर्णिमा इ.स.पू. ५२८ ला झाले होते.
४) वर्षावास
यो हवे दहरो भिक्खु, युञ्जति बुद्धसासने।
सो इमं लोकं पभासेति, अन्भा मुत्तोव चन्दिमा ।। (धम्मपदं : ३८२)
(जो भिक्खू तारुण्यात बुद्ध शासनात संलग्न असतो, तो मेधापासून मुक्त चंद्राप्रमाणे जगाला प्रकाशित करतो.)”
इसिपतन येथे पाच भिक्खूंना धम्मोपदेश केल्यानंतर तथागत भगवान बुद्धाने अनेकांना उपदेश देऊन कृतार्थ केले. त्यानंतर पावसाळ्याला सुरुवात झाली. पूर्व परंपरेप्रमाणे तथागताने देखील फिरून फिरून धर्मप्रचार करण्याचे धम्मदूताचे कार्य स्थगित केले. आणि एके ठिकाणी निवास केला. भिक्खूंना देखील वर्षाकाळात एके ठिकाणी निवास करण्याची आज्ञा दिली.
आषाढी पौर्णिमेलाच भगवान बुद्धांनी पंचवर्गीय भिक्खूंसह पहिला वर्षावास केला. म्हणून आजही भिक्खू लोक याच पौर्णिमेपासून वर्षावासाला सुरुवात करतात. म्हणजे कोणत्याही एका ठिकाणी राहून धर्मानुष्ठान व धर्मोपदेश करण्याचे व्रत स्वीकारतात.
धम्मदान करणाऱ्या सम्यक सम्बुद्धाचे स्मरण व्हावे म्हणून या पौर्णिमेला ‘गुरू पौर्णिमा’ सुद्धा म्हणतात. ही पौर्णिमा सर्वत्र वंदनीय असून तो दिन साजरा करण्याची प्रथा बौद्ध काळामध्ये होती.
भगवंतांनी पंचवर्गीय भिक्खूंना प्रथम धम्मदीक्षा सारनाथ येथील मृगदाय वनात दिली, तो कालावधी पावसाळ्याचा होता. तेव्हा तथागतांनी साजरा केलेला वर्षावास भगवंताचा व बौद्ध धम्माचा प्रथम वर्षावास म्हणून संबोधिला जातो. या वर्षावासाची सुरुवात आषाढ पौर्णिमेस होते आणि त्याची सांगता आश्विन पौर्णिमेस होते.
पावसाळ्यात कोणा एका विहारात धम्मोपदेश व चिंतन करण्यासाठी वास्तव्य करणे यासच ‘वर्षावास’ म्हणतात. भिक्खूंनी धम्माची शिकवण देता देता भिक्षा मागून चरितार्थ चालवावा असा दंडक होता. पावसाळ्याच्या तीन महिन्याच्या कालावधीत भिक्खूनी एके ठिकाणी मुक्काम करावयाचा, धम्मोपदेश करावयाचा, चिंतन व मनन करावयाचे, धम्मदेशना करावयाची असा प्रघात होता. यासच पावसाळ्यातील मुक्काम म्हणजे ‘वर्षावास’ म्हणतात. भगवान बुद्धांनी साजरा केलेला वर्षावासाचा प्रथम दिवस होता आषाढ पौर्णिमा इ.स.पू. ५२८ चा.
More Stories
अश्विन पौर्णिमा – अस्सयुज मासो Ashwin Purnima
भाद्रपद पौर्णिमा – पोट्ठपाद मासो Bhadrapada Poornima – Potthapada Maso
ज्येष्ठ पौर्णिमा Jyeshtha Purnima