January 16, 2026

Buddhist Bharat

Buddhism In India

सिद्धार्थाचे गृहत्याग

देश त्यागाचा निर्धार केला पक्का,
दुर करण्या रोहिणीच्या पाण्याचा तंटा,…
शाक्यांचे हीत सक्षणार्थ,
झाले सिद्धार्थ वचन बद्ध ,…..
परिव्रज्जेचा स्विकारला मार्ग,
मात करण्यास वैरावर…..
माता गौतमी व पिता शुद्धोधन,
गाळत अश्रृ झाले मौन, खचून गेले अंतकरण…..
अंतिम भेट यशोधरेला ,
अडले सिद्धार्थ शब्दकडेला,
मौन तोडत यशोधरा….
ठेवून भावनांवर नियंत्रण,
निर्णय हा आपला योग्यच….
पाठींबा दर्शवित, अनुमती देत ती वदली
घेणे मलाही परिव्रज्जा,
मी ही सोबत आपल्या …..
पण जवाबदारी राहूलच्या संगोपनाची
नको काळजी कुणाचीही, जावा तुम्ही निश्चिंत
प्रियजनांना सोडून होता परिव्राजक,
काढावा शोधून नविन जीवन मार्ग…..
कठोर,पोलादी अंतःकरणाने झाली ती व्यक्त ……
संयमशील ती झेलीत, पतीभक्तीपरायण ……
विसरुन कोसळलेले आभाळ
दिले सिद्धार्थांना समर्थन
धन्य त्याची माता,
धन्य त्याचे पिता,
धन्य ती पत्नी जिला,
असा पती लाभला
वदली किसा गौतमी

अर्चना चव्हाण, नागपुर.
8624062012