अकोला : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन सभाच्या वतीने शहरातील प्रमिलाताई ओक सभागृह येथे बुधवारपासून तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात
आले आहे.
४, ५ व ६ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता आयोजित व्याख्यानमालेत ‘भारतीय संविधान : लोकशाही सद्यस्थिती आणि भवितव्य’ या विषयावर मुंबई येथील अॅड. जयमंगल धनराज, ‘आरक्षणातील उपवर्गीकरण आणि सामाजिक न्याय’
या विषयावर छत्रपती संभाजीनगर येथील प्रा. श्रीकिशन एन. मोरे आणि ‘संविधानिक मूल्ये व बहुजनांची जबाबदारी’ या विषयावर नागपूर येथील डॉ. संजय शेंडे यांचे व्याख्यान होणार आहे, अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन सभेच्या वतीने देण्यात आली आहे.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त व्याख्यानमाला !

More Stories
सिलिकॉन व्हॅली आणि ‘एआय’ च्या युगात बौद्ध ध्यानाचा नवा प्रयोग: ‘मॅपल’ (MAPLE) संस्थेवर ‘द न्यू यॉर्कर’चा सविस्तर अहवाल चर्चेत
बोधगयातील बौद्ध भिक्षूंसाठी आता ओळखपत्र (ID Card) अनिवार्य; BTMC चा ऐतिहासिक निर्णय, ८१ ( बुद्ध विहार ) मठांकडून मागवली भिक्षूंची अधिकृत यादी
महाराष्ट्रातील बौद्ध लोकसंख्या : जिल्हानिहाय संपूर्ण यादी २०११