ऐरोली – बिहारच्या बुद्धगया येथे सुरू असलेल्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी नवी मुंबईमध्ये शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले. महाबोधी महाविहार बचाव कृती समिती, नवी मुंबई यांच्या वतीने आयोजित या रॅलीला विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि बौद्ध अनुयायांनी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला.
ही शांतता रॅली वाशी येथील बुद्ध प्रतिष्ठान येथून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे समाप्त झाली. या रॅलीत बौद्ध उपासक आणि उपासकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन बौद्ध एकतेचे दर्शन घडवून दिले. उपस्थित नागरिकांनी महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी नारे दिले आणि सरकारने तातडीने योग्य पावले उचलावीत, अशी मागणी केली.
महाबोधी महाविहार हा जागतिक वारसा स्थळ असून बौद्ध समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तरीही, त्यावर बौद्ध धर्मियांचा हक्क अबाधित राहावा आणि योग्य प्रशासनाची स्थापना व्हावी, अशी या आंदोलनाची प्रमुख मागणी आहे.
या शांतता रॅलीची प्रस्तावना व सूत्रसंचालन डॉ. अनंत हर्षवर्धन, भदंत प्रज्ञानंद महाथेरो, सिद्राम ओहोळ, महेश खरे, शिल्पा रणदिवे, विकास सोरटे, संदेश बनसोडे आदी मान्यवरांनी आपले विचार मांडले. या रॅलीच्या यशस्वी आयोजनाबद्दल समन्वयक सचिन दत्तू कटारे यांनी सर्व सहभागी संस्था, बौद्ध उपासक आणि उपासका, पत्रकार, पोलिस प्रशासनाचे आभार मानले. ही रॅली यशस्वी करण्यासाठी हजारोंच्या संख्येने बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते.
More Stories
Buddhist Circuit : बौद्ध सर्किट भेटींना चालना देण्यासाठी आंध्र प्रदेशने व्हिएतनामशी करार केला
भगवान.बुद्ध एक भौतिकशास्त्रज्ञ – अनिल वैद्य, माजी न्यायाधीश
Nashik : दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने वर्षावास ते पन्ना व दिवस कार्यक्रम संपन्न