अकोला : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन सभाच्या वतीने शहरातील प्रमिलाताई ओक सभागृह येथे बुधवारपासून तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात
आले आहे.
४, ५ व ६ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता आयोजित व्याख्यानमालेत ‘भारतीय संविधान : लोकशाही सद्यस्थिती आणि भवितव्य’ या विषयावर मुंबई येथील अॅड. जयमंगल धनराज, ‘आरक्षणातील उपवर्गीकरण आणि सामाजिक न्याय’
या विषयावर छत्रपती संभाजीनगर येथील प्रा. श्रीकिशन एन. मोरे आणि ‘संविधानिक मूल्ये व बहुजनांची जबाबदारी’ या विषयावर नागपूर येथील डॉ. संजय शेंडे यांचे व्याख्यान होणार आहे, अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन सभेच्या वतीने देण्यात आली आहे.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त व्याख्यानमाला !

More Stories
Buddhist Circuit : बौद्ध सर्किट भेटींना चालना देण्यासाठी आंध्र प्रदेशने व्हिएतनामशी करार केला
भगवान.बुद्ध एक भौतिकशास्त्रज्ञ – अनिल वैद्य, माजी न्यायाधीश
Nashik : दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने वर्षावास ते पन्ना व दिवस कार्यक्रम संपन्न