बुद्धांचे विचार जसे चीन मध्ये पोहोचले तसेच बौद्ध काळातील आयुर्विज्ञान देखील तेथे पोहोचले. याच ज्ञानाचा उपयोग करून चीन मध्ये अक्युपंक्चर विकसित झाले ज्यात आजारानुसार केसांच्या जाडीच्या सुई शरीरातील वेगवेगळ्या भागात टोचल्या जातात. यात कुठल्याही प्रकारची वेदना होत नाही उलट ट्रीटमेंट नंतर वेदनेचा नाश होऊन व्यक्तीला प्रसन्न वाटते.
अक्युपंक्चर असे मानते की शरीरातील ऊर्जा (चिनी भाषेत qi म्हणजे ची) असमतोल अथवा खंडित झाली की आपल्याला आजार होतो अथवा एखाद्या अवयवाला वेदना होतात. सुईच्या साह्याने या ऊर्जेचा खंडित प्रवाह सुरू होतो आणि त्यामुळे शरीरातील ऊर्जा समतोल रहायला मदत होते. यासाठी विविध आजार अथवा दुखण्यासाठी गरजेनुसार २० मिनिटांच्या अनेक सिटींग घ्यावे लागते.
गेल्या २५०० वर्षांपासून चीन मध्ये अस्तित्वात असलेली ही पारंपरिक चिकित्सा पद्धती आता जगभर प्रसिद्ध झाली आहे.
डॉ. साक्षी भोसेकर यांनी भारतात आयुर्वेदाचे शिक्षण घेतल्यानंतर चीन मधील शांघाई विद्यापीठात अक्युपंक्चरचे शिक्षण घेतले असून, नाशिक मध्ये आता अक्युपंक्चरचे क्लिनिक उघडले आहे.
अक्युपंक्चर हे सांधेदुखी, sciatica, कंबरदुखी, मानदुखी, तसेच निद्रानाश, अर्धशिशी, अर्धांगवायू व शरीरातील अनेक दुखण्यावर अतिशय प्रभावी उपचार पद्धत आहे.
आपल्या माहितीतील ज्यांना या उपचार पद्धतीचा लाभ घ्यायचा असेल त्यांना जरूर कळवावा. अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे.
क्लिनिकचा पत्ता – 311, रूंगठा मॅजेस्टिक, बस स्टॉप जवळ, कमोद नगर, नाशिक
More Stories
Nashik दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या नुतन इमारत कोनशिला उद्घाटन सोहळा संपन्न झाला
✨ धम्म प्रचार प्रसार सेवा सहयोग सहकार्य आवाहन Donate For Dhamma Prachar
दलाई लामा यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त १३ जुलै रोजी नवी दिल्लीत जागतिक बौद्ध परिषद होणार आहे.