जेष्ठ पत्रकार महामानव प्रतिष्ठानचे अध्यक्ष एक वही एक पेन अभियानचे प्रणेते व समाजभूषण राजू झनके यांच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त संत गाडगे महाराज विद्यालयातील वसतिगृहातील १०० विद्यार्थ्यांना एक वही एक पेन वितरण करण्यात आले
जेष्ठ पत्रकार महामानव प्रतिष्ठानचे अध्यक्ष एक वही एक पेन अभियानचे प्रणेते व समाजभूषण राजू झनके यांच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त आज त्यांनी शिक्षण घेतलेल्या संत गाडगे महाराज विद्यालयातील वसतिगृहातील १०० विद्यार्थ्यांना एक वही एक पेन अभियानांतर्गत शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील पहिले मंदिर म्हणून मान मिळविलेल्या विद्यालयातील मंदिरात महाराजांना अभिवादन करण्यात आले.तसेच संत गाडगे महाराज यांनाही अभिवादन करण्यात आले.
सदर प्रसंगी विद्यालयाचे संचालक प्रकाश चौधरी,महामानव प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष व अभियानचे सदस्य राजेश उबाळे राजू लोखंडे ,प्रकाश सोनवणे सम्यक झनके आदी उपस्थित होते.
More Stories
दलाई लामा ९१ वर्षांचे होत असताना, भारत आणि चीन बौद्ध धर्माच्या भविष्यासाठी संघर्ष करत आहेत
थायलंडच्या अपघातात जखमी झालेल्या भिक्षूंच्या देखभाल त्यांना राजेशाही संरक्षणाखाली उपचार पुरवले जातील.
बोधिमग्गो महाविहार प्रवेश व्दार चे भूमि पूजन संपन्न