भंडारा: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल समाज माध्यमावर अत्यंत अश्लील भाषेत आणि आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला काल रात्री वरठी पोलिसांनी अटक केली आहे. अट्रोसिटी कायद्याअंतर्गत वरठी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
आरोपी रजत सेलोकर, रा. सातोना याने काल दि. ७ जुलै रोजी व्हॉट्सॲपच्या एका ग्रुपवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत ‘संविधान लिहिणारे देशाचे पहिले बलात्कारी’ अशी आक्षेपार्ह पोस्ट टाकली. पंधरा दिवसांपूर्वी देखील या तरुणाने व्हॉट्सॲप गृपवर भीम सेनेबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. त्यावेळी पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी स्वतः वरठी पोलीस ठाण्यात येऊन या तरुणाला समज दिली होती.
रजत सेलोकर हा मुंबई येथून उच्च शिक्षण घेऊन स्वगावी सातोना येथे परत आलेला असल्याची माहिती आहे. त्यांचे भवितव्य खराब होऊ नये याकरिता त्यावेळी त्याच्यावर गुन्हे दाखल न करता समजूत घालून सोडून देण्यात आले होते. मात्र पंधरा दिवसांनंतर त्याने पुन्हा डॉ. बाबासाहेबांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकून धार्मिक भावना दुखावून समाजामध्ये जातीवाचक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या पोस्टवर आक्षेप घेत भीम सेनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्याकडे आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला अटकेची मागणी केली.
काही काळ या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी ताबडतोब कारवाईचे आदेश दिले. ७ जुलै रोजी आरोपीने हा मजकूर व्हॉट्सॲप ग्रूपवर टाकला होता. त्याचे स्क्रीन शॉट्स काढून पोलीसांत तक्रार देण्यात आली. या प्रकरणी शुभम ऊके रा.सतोना आंबेडकर वार्ड याच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात वरठी पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानच्या अॅट्रॉसिटी ॲक्ट आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे
More Stories
🌸 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न – बुद्धिस्ट भारत 🌸 Buddhist Bharat
महाबोधी महाविहार मुक्ती मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही-भन्ते विनाचार्य
समता सैनिक दलात सामील होण्यासाठी भव्य आवाहन! ✨📢