” बुध्द ”
जगातील सर्व प्रकारच्या हाव, हवस, द्वेश, क्रोध, अहंकार, मी पणा, मोठे पणा, निराशा, दुख: या वर परफेक्ट उत्तर म्हणजे बुध्द ……!
या देशातील व जगातील सर्व धर्मांना व त्यांच्या विचारांना समजून घेतल्यावरच गौतम बुध्दांचे खरे महानता – महत्व – विद्वता समजते .
बुध्द समजून घेणे सोपे नाही पण, खूप कठीण सुध्दा नाही, कारण इथे खरे फुले, शाहू, आंबेडकर हेच लोकांना समजाना झाले आहेत, या इथे महापुरुषांचे भक्त जथाच्या जथ्थे तयार होत आहेत अनुयायी मात्र ठराविक घडत आहेत, बुध्द समजण्यासाठी कुठल्याही जाती- धर्माचा थोडा ही गंध नसावा लागतो, बौध्द हा धर्म नव्हे तर धम्म आहे.
धम्म म्हणजे विज्ञान, निसर्ग, मानवता, माणुसकी …….!
बुध्दांच्या तत्वज्ञानात,
आत्मा, परमात्मा, स्वर्ग, नर्क, पाप, पुण्य, चमत्कार, भविष्य, पंचाग, मुहूर्त, तिथी हे सर्व थोतांड आहेत …….!
ज्या प्रमाणे गंगा, यमुना, नर्मदा, गोदावरी या सर्व नद्या समुद्र- महासागरात मिसळल्या नंतर, हे ओळखता येत नाही की, कोणत्या नदीचे पाणी कोणतं आहे तसेच बुध्द धम्मात सुध्दा जातीभेद, वर्णभेद, स्त्रीभेद यांना मुळीच थारा नाही तिथे सर्व समानता आहे ……
भारतात सर्वच जय भिम वाले बौध्द विचारांचे आहेत असे नाही,
त्यात ९०% हे भक्त आहे फक्त १०% अनुयायी आहेत,
जे अनुयायी आहेत तेच खरे बौध्द विचारधारेचे पाईक आहेत …..!
बुध्द हे शुद्र कुटुंबातील नसून ते एक शाक्य कुळातील राजा शुध्दोदन व राणी महामाया यांचे सुपुत्र, युवराज सिध्दार्थ होते ……
या देशात काही मुर्खांना आंबेडकर या नावाचे एलर्जी असल्यामुळे महान मानवतावादी बुध्दांना सुध्दा अस्पृश्यतेचे चटके बसत आहेत ……!
तरी सुध्दा आजच्या घडीला,
बुध्द हे जागतिक महान तत्वज्ञानी सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध आहेत हे जगाने मान्य केले आहे ……!
या जगात अनेक विद्वानांनी धर्म शिकविले पण,
विज्ञानवादी मानवता धम्म ( विज्ञान ) शिकविणारे एकमेव जागतिक महान व्यक्ती म्हणजे तथागत बुध्द …….
जागतिक पहिले शास्त्रज्ञ
तथागत बुध्द होय ……!
अहिंसेच्या विचारांने क्रांती घडविणारे पहिले जागतिक एकमेव महान व्यक्ती तथागत बुध्द होय …..!
भारतालाच नव्हे तर जगाला सदाचार शिकविणारे पहिले महापुरुष तथागत बुध्द होय …..!
( तथागत गौतम बुध्दांनी सात कोड्याना दिलेले उत्तर …… )
१) या जगात सगळ्यात टोकदार वस्तू कोणती ?
शिष्य : तलवार
गौतम बुध्द : जीभ
२) या जगात आपल्या पासून सगळ्यात दुर काय आहे ?
शिष्य : सुर्य, चंद्र, आकाशगंगा
गौतम बुध्द : भूतकाळ
३) या जगातील सर्वात मोठी गोष्ट कोणती ?
शिष्य : पर्वत, पृथ्वी, सुर्य
गौतम बुध्द : हाव
४) पृथ्वीवरील सगळ्यात वजनदार वस्तू कोणती ?
शिष्य : पोलाद, लोखंड, हत्ती
गौतम बुध्द : वचन
५) पृथ्वीवरील सर्वात हलकी वस्तू कोणती ?
शिष्य : कापुस, हवा, धुळ, पाने
गौतम बुध्द : मी आणि मी पणा
६) पृथ्वीवरील माणसाच्या सगळ्यात जवळची गोष्ट कोणती ?
शिष्य : आईवडिल, मित्र, नातेवाईक
गौतम बुध्द : मृत्यू
७) या जगात करता येण्यासारखी सगळ्यात सोपी गोष्ट कोणती ?
शिष्य : खाणे, पिणे, फिरणे
गौतम बुध्द : आपल्याकडे असलेले ज्ञान इतरांसोबत शेयर करणे.
चार्वाक, नेवृर्ती, कबीर, बसवेश्वर, तुकोबा, शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर, प्रबोधनकार, अमरशेख, अण्णाभाऊ, दाभोळकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश इतर सर्व समतावादी, परिवर्तनवादी, मानवतावादी बहुजन महापुरुषांचे साहित्य, इतिहास वाचलो त्या सर्वांचे केंद्रबिंदू – सार तथागत बुध्द आहेत …….!
तथागत बुध्दा कडून हे शिकलो कि, जिवन हे एकदाच आहे,
पुन्हा- पुन्हा हे जिवन नाही म्हणून या जिवनात जेवढे चांगले काम सर्व सामान्य जनतेच्या हितासाठी करता येईल तेवढे आपल्या पध्दतीने अंतःकरणा पासून स्वाभिमानाने व प्रामाणिक पणाने करण्याचे ठरविले आहे ……!
अंहकार, मी पणा, मोठे पणा सोडले तर हे सर्व शक्य आहे हे मी कधीच सोडले आहे ……!
ना हम आस्तिक है l
ना हम नास्तिक है ll
हम तो वास्तविक है ….!
सत्य की जय हो …..!
सर्व मानवतावादी बांधवांना,
ऐतिहासिक बुध्द पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ….!
More Stories
🪷 तथागत भगवान बुद्ध, योग आणि विपश्यना : आत्मशुद्धीचा खरा मार्ग 🪷
बुद्ध धम्म (बौद्ध धर्म) हा दुःखमुक्तीचा मार्ग आहे Buddha Dhamma (Buddhism) is the path to liberation from suffering.
गौतम बुद्धांचे 10 प्रेरणादायी विचार 10 Inspirational Thoughts of Gautama Buddha